पिंपरी-चिंचवड

मास्कचा वापर करत नाही? तर...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर आता 500 किंवा 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काढला. त्याची अंमलबजावणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 500 रुपये दंडाची कारवाई केली जात होती. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समिती सभेने दंडाची रक्कम 500 ऐवजी 200 रुपये आकारावी, असा ठराव मंजूर केला. त्यामुळे आता मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, गेल्या महिन्यात लाॅकडाउन शिथिल झाले. लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले. संसर्ग झालेल्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश काढला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महापालिका स्तरावर आयुक्त, नगरपालिका किंवा नगर पंचायत स्तरावर मुख्याधिकारी/प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक आदेशाची अंमलबजावणी करतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अकरा मार्च रोजी शहरातील पहिला रुग्ण आढळला होता. सध्या रुग्ण संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे असून आयुक्तांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या रकमेत आता विभागीय आयुक्तांनी वाढ केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक जण मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोना रोखण्याकरिता मास्क आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी सक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. 

दरम्यान, आतापर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या सुमारे चारशे जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कडून दीड लाख रुपयांपेक्षा दंड वसूल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT