पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पोहोचतोय 400 वर...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या 36 तासांत अर्थात मंगळवारी सकाळी सातपर्यंत 38 जणांची भर पडली. म्हणजेच तासाला एक रुग्ण आढळला. विशेष या 36 तासांत एकाही रुग्णाला डिस्चार्ज मिळालेला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या 391 झाली असून, सध्या 214 जणांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत यापूर्वी आढळलेले रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता ढोरेनगरमध्ये रुग्ण आढळला आहे. रुपीनगर व आनंदनगर हाॅटस्पाॅट ठरले आहेत. 

काकडे पार्क चिंचवडमध्ये शिरकाव

गेल्या 36 तासांत शहरात आढळलेले रुग्ण आनंदनगर- चिंचवड, जुनी सांगवी, रुपीनगर, काकडेपार्क चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भाटनगर पिंपरी, बौद्धनगर पिंपरी, किवळे भागातील आहेत. त्या 38 जणांमध्ये 19 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. तसेच, पुण्यातील एक पुरुष व एका महिलेचा रिपोर्टही पाॅझिटीव्ह आला आहे. मात्र, येरवड्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चारशेचा आकडा पार

सध्या रुग्णालयात शहरातील 214 व पुण्यातील 29 जणांवर वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रुग्णालयांत शहरातील 23 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 170 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर शहरातील सात जणांचा मृत्यू झालेला आहे. पुण्यात आणि वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या शहरातील एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 414 झाली आहे. 

आनंदनगरमध्ये तपासणी

दरम्यान, आजपर्यंत आनंदनगर चिंचवड परिसरातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील संशयित व लक्षणे असलेल्या नागरिकांची कोरोना पूर्व तपासणी मोबाईल लॅबद्वारे केली जात आहे. सोमवारी दिवसभर केलेल्या तपासणीत आढळले 86 संशयितांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडे तपासण्यासाठी पाठवले आहेत. आज दुपारपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सांगवीतील ढोरेनगर, रुपीनगरमधील सहयोगनगर सील
जुनी सांगवी : ढोरेनगर परिसरातील राज मसाले- योगिराज जनरल स्टोअर्स- ढोरेनगर गल्ली नंबर एक व दोन-  जैन मंदिर-सुमश श्री अपार्टमेंट- आनंद सुपर मार्केट.

रुपीनगर : सहयोगनगर- ओंकार जनरल स्टोअर्स- बालाजी प्रिंटर्स- नॅशनल गॅरेज- त्रिवेणीनगर रोड हे परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून सील करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT