पिंपरी-चिंचवड

मधमाशीमुळे गमवावा लागला जीव!

सकाळ वृत्तसेवा

देहू : देहूरोड बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा मधमाशी चावल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ वाजता देहूरोड येथे घडली. देहूरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. 

ईरन्ना शेट्टी (वय 40) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी सकाळी देहूरोड येथे भाजी आणण्यासाठी जात होते. त्यावेळी पुणे-मुंबई महामार्गालगत थॅामस बाजार या नावाची इमारत आहे. या इमारतीच्या बाहेर मधमाशांचे अनेक मोठे पोळे आहे. त्यातील एका पोळवरील मधमाश्या अचानक खाली आल्या. त्यामुळे रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना वाटले मधमाशी चावेल, या भीतीने सैरभेर झाले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यात शेट्टी यांना मधमाशी चावली. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, मानसिक धक्का बसल्याने ते उपचारापूर्वींच मयत झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. शेट्टी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला. देहूरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT