Crime 
पिंपरी-चिंचवड

तेरा तरूणींची सुटका; ऑनलाईन सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तेरा तरुणींची सुटका केली. तर एकाला अटक केली आहे. 

अर्जुन प्रेम मल्ला (वय 36, रा. विमाननगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी हे एका वेबसाईटच्या माध्यमातून वेश्‍या व्यवसायासाठी फोन क्रमांक ग्राहकांना पुरवत असत. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवले जात. त्यातून ग्राहकाने मुलगी निवडल्यानंतर त्यांना पाहिजे असलेल्या ठिकाणी मुलींना पाठवले जात. त्याबदल्यात संबंधित ग्राहकांकडून तब्बल आठ ते वीस हजार एवढी रक्कम घेतली जात. या सेक्‍स रॅकेटची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करून बनावट ग्राहक आरोपीकडे पाठवले. त्यातून पोलिसांनी 13 महिलांची सुटका करत एकाला अटक केली. आरोपीकडून एक मोटार व मोबाईल फोन असा एकूण चार लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक मुदळ, समाधान कदम, पोलिस अंमलदार किरण पवार, नितीन पराळे, विजय घाडगे, आकाश पांढरे, रवी पवार, सागर जाधव, ओम कांबळे, दत्तात्रय शिंदे, रेखा धोत्रे, पूनम आल्हाट, सुप्रिया सानप, भाग्यश्री जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

SCROLL FOR NEXT