पिंपरी-चिंचवड

'अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी म्हणतायेत 'आमचं सरकार पाडणार", वाचा प्रवीण दरेकर काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्यासह देशावर कोरोनाचे मोठे संकट ओढावले आहे. सर्वच जण भयभीत असून, त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकार पाडणे हा आमचा प्राधान्याचा विषय होऊच शकत नाही. परंतु, राज्य सरकारला कोरोना रोखण्यात आलेले अपयश व आरोग्य व्यवस्थेची जी दुरवस्था झाली आहे. त्यापासून दुसरीकडे लक्ष विचलित करण्यासाठी आमच्या ध्यानी मनी नसतानाही विरोधक 'आमचं सरकार पाडणार' असे सत्ताधारी मुद्दामहून म्हणत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता. 26) चिंचवड येथे केली. 

चाकण येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाच्या तपासाबाबत प्रवीण दरेकर यांनी रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पिंपरी-चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक, वर्षा डाहाळे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरेकर म्हणाले, "सध्याची वेळ ही राजकीय टीका-टिप्पणी करण्याची नसल्याचे भान सरकारने ठेवायला हवे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सरकारने सर्वांना सोबत घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करायला हवी. रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून, आरोग्य व्यवस्थेतील उणीवा दूर करायला हव्यात. वेळेत नियोजन न झाल्यास दुर्देवाने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा.'' अयोध्यातील राममंदिराचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करा, असे म्हणणे म्हणजे दुर्दैव असल्याची टीकाही यावेळी दरेकर यांनी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : अपक्षांसाठी सफरचंद, बिस्कीट, पाव, केक; महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोगाकडून १९४ चिन्हे निश्चित

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : मनसेचा आज मुंबईत पहिला मेळावा, राज ठाकरे करणार संबोधित

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

SCROLL FOR NEXT