पिंपरी-चिंचवड

महत्त्वाची बातमी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी उद्यापासून ही नवी नियमावली

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी काढला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. 1) करण्यात येणार आहे. त्यानुसार 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने पी 1, पी 2 या पद्धतीने रोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. शहराच्या अन्य भागातील दुकाने मात्र, नियमितपणे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहतील. 

हे आहेत प्रतिबंधित क्षेत्र 

1) चिंचवड स्टेशन
2) पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक 
3) गांधी पेठ चाफेकर चौक चिंचवड
4) काळेवाडी मेनरोड (एम एम स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल) 
5) अजमेरा पिंपरी
6) मोशी चौक, मोशी आळंदीरोड
7) महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप
8) डांगे चौक ते काळेवाडी फाटा
9) भोसरी आळंदीरोड
10) कावेरीनगर मार्केट
11) कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक
12) दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठामधील दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पी 1, पी 2 तत्वानुसार सुरू राहतील. म्हणजेच, रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुसऱ्या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. सदर बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरू असतील त्याच्या विरुध्द बाजूस वाहनांचे पार्किंग करण्यात यावे. जेणेकरून सुरू असलेल्या दुकानांसमोरील जागा सामाजिक अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल. 

संपूर्णत: प्रतिबंधीत केलेल्या बाबी 

  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लासेस
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा
  • सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा 
  • सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम 
  • सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद राहतील

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहेत निर्बंध 

  • नागरिकांच्या हालचाली अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री नऊ ते पहाटे पाच या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहेत. 
  • 65 वर्षावरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. 
  • वैद्यकिय व अत्यावश्‍यक सेवा, तसेच अत्यावश्‍यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्‍यक वाहतूक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र (कटेंनमेंट झोन) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT