PCMC Will Launch of leprosy research campaign 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम

सुवर्णा नवले

पिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग निदान कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत चिंचवडगावामधील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सक्रिय क्षयरोग शोध मोहीम, कुष्ठरोग शोध मोहीम आणि जनजागरण अभियानाचे उद्‌घाटन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते आज (ता.1) करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. कमलाकर लष्करे, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदेव साबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालय प्रमुख डॉ. सुनील जॉन, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ. अंजली ढोणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.


अतिरिक्त आयुक्त पाटील म्हणाले, ""समाजातील सर्व क्षयरोग रुग्ण व कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन निदान निश्‍चिती नंतर औषधोपचार त्वरित सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार महापालिकेतील अति जोखमीच्या कार्यक्षेत्रातील निदान न झालेले कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकरशोधून संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने हे सीबीनॅट/ट्रयुनॅट मशिनद्वारे व एक्‍सरे तपासणी करणे व रुग्णांना त्वरित मोफत औषधोपचार करणे तसेच क्षयरोग व कुष्ठरोग विषयी जन जागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तरी या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांचा मृत्यू; तर 172 नवीन रुग्ण 

असे राबविणार अभियान
- कालावधीत - 1 ते 16 डिसेंबर 2020
कार्यक्षेत्रातील एकूण लोकसंख्या - 4, 49,750
-घरांचे सर्व्हेक्षण - 89, 950
-257 टीम व 52 पर्यवेक्षकांची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT