krishna prakash sakal media
पिंपरी-चिंचवड

कृष्ण प्रकाश यांना 'खाकी'चा असाही अनुभव

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी- पोलिस कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाण्यात बसले होते, मध्यरात्री एक मुस्लिम दाम्पत्य तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले, पोलिसाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिले, मात्र काही वेळातच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची भंबेरी उडाली. कारणही तसेच होते खुद्द पोलिस आयुक्तच तक्रारदार म्हणून पोलिस कर्मचाऱ्यापुढे उभे ठाकले होते. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला असता पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना येणारा कटू अनुभव पोलिस आयुक्तांना अनुभवण्यास मिळाला. तर वाकड व हिंजवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाही चांगले सहकार्य केल्याचेही दिसून आले. (pimpari chinchwad news police commissioner kirshna prakash Disguise muslim man station)

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री वेशांतर करून आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांची पाहणी केली. ते जमालखान पठाण बनले होते. दाढी चिकटवून, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला होता. तसेच सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्कही होता. तर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे या देखील वेशांतर त्यांच्यासोबत होत्या. हे मुस्लिम दाम्पत्य खासगी टॅक्सी करून रात्री सव्वा बाराच्या सुमारास पिंपरी पोलिस ठाण्यात आले.

आम्ही पिंपरीतील म्हाडा प्रकल्पात राहत असून आमच्या शेजाऱ्याला महिलेला रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर आठ हजार रुपये सांगितले. पैसे खूप मागतायेत. व यायलाही तयार नाहीत, महिलेची प्रकृती नाजूक आहे, रुग्णवाहिका चालक अधिकचे पैसे घेऊन आर्थिक लूट करतोय, यावर काहीतरी करा, तुम्हा तक्रार दाखल करून घ्या’ अशी तक्रार घेऊन ते आले. मात्र, सामान्य नागरिकांना जसा अनुभव येतो. तोच खुद्द पोलिस आयुक्तांनाही आला. “तुम्ही संत तुकारामनगर चौकीत जावा, तेथे काय सांगायचे ते सांगा” असे उत्तर मिळाले. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार येथेच तक्रार दाखल करून घ्या, अशी विनवणी करूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. दरम्यान, काही वेळाने पोलिस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर ते पोलिस आयुक्त असल्याचे समोर आले. हे समजताच संबंधित पोलिसाला अक्षरशः घाम फुटला.

त्यानंतर हे दाम्पत्य रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी पोलिस स्टेशन व नंतर दोन वाजता वाकड ठाण्यात गेली. त्या ठिकाणी “आमच्या परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो, काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला मारहाण केली”, अशी तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसाने सर्व प्रकऱणाची माहिती घेत कच्ची फिर्यादही तयार केली. आपण वरिष्ठांना बोलावतो, तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली. दरम्यान, काही वेळाने पोलिस आयुक्तांनी आपली ओळख दाखविल्यावर संबंधित कर्मचाऱ्याला काय करावे काहीच सुचेना.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ड्युटीवरील कर्मचारी स्टाफ खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशाप्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र, वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला. यापुढेही अशाप्रकारे अचानक भेट देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT