Pimpari sangavi fake documents Land fraud
Pimpari sangavi fake documents Land fraud sakal
पिंपरी-चिंचवड

बनावट कागदपत्रे बनवून 'बोगस' गुंठेवारीचा पिंपरीला विळखा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बनावट कागदपत्रे बनवून ‘बोगस’ गुंठेवारीची प्रकरणे केली असल्याचे उघड झाले आहे. जुनी सांगवी येथे दुसऱ्याच्या जागेत दोघांनी सहा रो हाऊस बांधून त्यांची विक्रीही केली आहे. यासाठी कुलमुखत्यारपत्र व विक्रीपत्र तयार करण्यासाठी बनावट शासकीय कागदपत्रे वापरली आहेत. अशीच बनावट कागदपत्रे तयार करून १० ते १२ हजार बोगस गुंठेवारीची प्रकरणे झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

सांगवीतील पवना व मुळा नदीच्या काठाजवळील ममतानगर भागात तक्रारदाराच्या सव्वातीन गुंठे जागेची बनावट कागदपत्रे तयार करून सहा रो हाउस बांधून त्यांची विक्री केली. त्याच जागेजवळील सरकारी जागेत तीन ते चार गुंठे जागेचीही बनावट कागदपत्रे बनवून त्यावरही चार रो हाउस बांधून विकले आहेत.

नोंदणी महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारींमध्ये, सुमारे तीन हजार २५० चौरस फूट जमीन हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या मूल्यमापनाखाली सातबारा उतारा, विक्री करार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे गुंठेवारी प्रमाणपत्रे यांसारख्या बोगस जमिनीच्या नोंदींचा वापर केल्याचा आरोप केला आहे. जुनी सांगवीतील सर्व्हे नंबर २/३ ममतानगरमध्येही रो-हाऊस बांधून बांधकाम व्यावसायिकांनी विकले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना चौकशीचे आदेश दिले तर नोंदणी महानिरिक्षकांच्या आदेशानुसार पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी आणि सहजिल्हानिबंधक, पुणे यांनी विक्री करार आणि कुलमुखत्यारपत्र जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सांगवी पोलिस तक्रारीचा तपास करत असून लवकरच गुन्हा नोंदविण्याची शक्यता आहे.

उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी २० एप्रिल २०२२ रोजी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या तातडीच्‍या आदेशाच्‍या आधारे हवेली प्रांत संजय आसवले यांना आपला अहवाल पाठविण्‍याचे व भोसरी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्‍या बेकायदेशीर आदेशाचे पुनरावलोकन करण्‍याचे पत्र दिले. तसेच कवडे यांच्या बेकायदेशीर आदेशाबाबत १० दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे तर हिमनगाचे टोक

बनावट प्रमाणपत्रांद्वारे बँकांकडून कर्ज घेण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकांनी बनविलेली ४ ते ५ हजार बोगस गुंठेवारी प्रमाणपत्रे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. केवळ ३ हजार २५० चौरस फुटांमध्ये अशी ६ बोगस प्रमाणपत्रे तयार केली असून ही केवळ हिमनगाचे टोक असून, आणखी हजारो प्रकरणे समोर येण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस गुंठेवारी प्रकरणाची लेखी तक्रार आमच्याकडे आली आहे. कागदपत्रांची तपासणी करून याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्त व उपायुक्तांना पाठवून संबंधित सर्व आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

- सुनील टोणपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT