corona vaccination Esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोव्हॅक्सिन लशीचे आज फक्त ८०० डोस उपलब्ध

चार केंद्रांवर मिळणार पहिला व दुसरा डोस

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेला (pimpri chinchawad corporation) कोव्हॅक्सिन (covaxine) लशीचे फक्त ८०० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. २६) केवळ चार केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. कोविशिल्ड (covishield) लशीचा साठा उपलब्ध नसल्याने ती दिली जाणार नाही, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. (Pimpri 800 doses covaxine vaccine available today)

शिवतेजनगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल व चिंचवड येथील मोरया हॉस्पिटल या केंद्रांवर प्रत्येकी दोनशे डोस उपलब्ध झाले आहेत. तिथे १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी शंभर नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेले असावेत. प्रत्येक केंद्रावरील दोनशेपैकी १६० लाभार्थ्यांना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

केवळ ४० जणांना किओस्क मशिनद्वारे टोकन मिळेल. ४५ वर्षांवरील नागरिकांना नवीन भोसरी रुग्णालय व पिंपळे निलख इंगोले शाळा येथे पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यासाठी दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी दोनशे डोस उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक केंद्रावरील दोनशेपैकी १६० लाभार्थ्यांची लसीकरण केंद्रावरच नोंदणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT