water tank sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : टाक्यांच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमवा

मोशी पेठ क्रमांक सहामध्ये पालिकेच्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र अडीच महिन्यांपासून एकही सुरक्षारक्षक तेथे नाही

सकाळ वृत्तसेवा

मोशी : बोऱ्हाडेवाडी व मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामध्ये महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांच्या आवारात सुमारे अडीच महिन्यांपासून एकही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे तेथील विविध वस्तूंच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘महापालिकेने दिलेले टेंडर व ठेकेदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, महापालिकेमार्फत कोविड उपचारासाठी फंड जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षारक्षक कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे सांगितले आहे. पण, एकाच ठिकाणावरील सर्व सुरक्षारक्षक काढून टाकणे चुकीचे आहे.

जेथे तीन सुरक्षारक्षक असतील तेथे दोन, जेथे दोन असतील तेथे एक अशाप्रकारे नियोजन करावे. परंतु, तसे न करता सगळे सुरक्षारक्षक काढून टाकल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.’’ दरम्यान, याठिकाणी चोरी किंवा टाकीवर चढून आत्महत्येसारखा दुसरा अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकांची गरज आहे.

त्यामुळेच येथे सुरक्षारक्षक ठेवले होते. आता येथील जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे ठेकेदाराला सूचना करून सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी प्रवीण बोऱ्हाडे, संतोष सस्ते, रोहित हजारे, तुषार बोऱ्हाडे, पूजा बोऱ्हाडे आदींनी केली आहे.

कोविडमुळे महापालिकेवर आर्थिक भार आहे. त्यामुळे सध्या इतर गरजेची नसलेली कामे कमी करावे. पाण्याच्या टाकीवरील सुरक्षतेची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे. याठिकाणी व्यवस्थित नियोजन करून पुन्हा सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : "शपथविधीच्या कठीण प्रसंगी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ होत्या”; सुनेत्रा पवारांचा शिवनेरीवर भावनिक खुलासा

Broadcast Media : प्रसारमाध्यमांना यंदा भरपूर जाहिराती! मागील वर्षापेक्षा ९.७ टक्के वाढ; डिजिटल माध्यमांना ६८ टक्के वाटा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Shrigonde Accident: दुर्दैवी घटना! श्रीगोंदे चौकातील अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू; भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक, कामावर निघाले अन्..

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे उघड; केरळमधून 21 वर्षीय आलिफ इस्लामला बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT