in Pimpri-Chinchwad 164 positives and Four deaths in 24 hours 
पिंपरी-चिंचवड

कालचा आकडा धक्कादायकच होता! पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत १६४ पाॅझिटीव्ह; चार मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कालचा सोमवार कोरोनाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत सर्वात धक्कादायक ठरला. कारण, रविवारी मध्यरात्री बारापासून सोमवारी मध्यरात्री बारापर्यंत संपलेल्या चोवीस तासांत तब्बल १६४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. म्हणजेच तासाला सात रुग्ण आढळले. रात्री बारा वाजेपर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९४६ झाली होती. तसेच, काल दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. हा आकडाही आजपर्यंतचा सर्वाधिक राहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तीन जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले आहेत. काल हीच संख्या तीस होती. सोमवारी रात्री नऊ पासून रात्री बारा वाजेपर्यंत अवघ्या तीन तासांत ४९ जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले होते. आजपर्यंत एकूण १०७९ जण बरे झाले आहेत. सध्या ८३६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल पॉझिटिव्ह आढलेले रुग्ण, सिद्धार्थनगर दापोडी,  सांगवी, कामगार भवन पिंपरी, शंकरनगर, अजंठा नगर, पिंपळे निलख, दत्तनगर, तापकीर नगर, नढेनगर, मधुबन सोसायटी, संत ज्ञानेश्वर काॅलनी पिंपरी, सुदर्शन नगर, मोरेश्वर काॅलनी थेरगाव, सृष्टी चौक, विशाल नगर, काटेपूरम चौक सांगवी, कोकणे नगर, नाशिक महामार्ग मोशी, दिघी रोड भोसरी, बोपखेल, किनारा हाॅटेल दापोडी, मोरया पार्क चिंचवड, नवभारत नगर, संभाजीनगर, सोनिगरा सोसायटी चिंचवड स्टेशन, आदर्श नगर, पाटील नगर, इंदिरानगर, बौद्ध नगर, वल्लभनगर, जयभीमनगर, पंचतारा नगर आकुर्डी, सिंधूनगर प्राधिकरण, देहूरोड, नेहरूनगर, फुलेनगर, वैशाली नगर, संत तुकाराम नगर पिंपरी, आकुर्डी गाव, चिंचवड स्टेशन, थेरगाव, दापोडी, देहू, विजयनगर, नानेकर चाळ पिंपरी, पुण्यातील मंगळवार पेठ येथील रहिवासी होते. 

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त मास्क ठेवावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT