पिंपरी-चिंचवड

कोविड सेंटरला 65 टक्के रक्कम देणार; पिंपरी-चिंचवडला 'स्थायी'च्या सभेत मंजुरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : एकही रुग्ण नसताना कोविड केअर सेंटरचे बिल मंजूर का करायचे? त्याबाबतचा हिशेब द्यावा, यावरून गेल्या तीन आठवड्यापासून स्थायी समिती सभेत विषय तहकूब होता. त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर, रुग्णांचे जेवण व औषधोपचाराचा खर्च वगळून उर्वरित रकमेच्या 65 टक्के खर्च देण्यास सोमवारी स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. दरम्यान, रुग्णालयांशी केलेल्या करारनाम्यानुसार, रक्कम दिल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये, हॉटेल, महाविद्यालये, संघटना व स्वयंसेवी संस्थांना कोविड केअर सेंटर 90 दिवसांच्या मुदतीसाठी चालवण्यास दिले होते. बेडच्या संख्येनुसार त्यांना खर्च देण्याचे ठरले होते. मात्र, ऑक्‍टोबरपासून रुग्ण घटू लागल्याने टप्प्याटप्प्याने कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यांची 'अ', 'ब' आणि 'क' अशी वर्गवारी केली होती. 'अ' वर्गात सहा, 'ब' वर्गात 16 व 'क' वर्गात एक कोविड केअर सेंटर होते. 'अ' वर्गातील दोन सेंटर वापरातच आले नाहीत. त्यांची सुमारे साडेपाच कोटी रुपयांची बिले देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावर गेल्या तीन स्थायी समिती सभेत आक्षेप घेण्यात आला. अखेर त्यावर सोमवारी सादरीकरण घेण्यात आले आणि विषय मंजूर करण्यात आला. 

हर्डीकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "रुग्ण वाढत असल्याने दहा हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा सरकारचा आदेश होता. मात्र, आपल्या क्षमतेइतकेच सेंटर आपण तयार केली. त्यातील यंत्रणा व मनुष्यबळासाठी निविदा मागवल्या. वर्गवारी करून दर ठरवले. यंत्रणा तयार ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, रुग्ण कमी होऊ लागल्याने व होमआयसोलेशनला परवानगी मिळाल्याने 'अ' दर्जाच्या दोन सेंटरमध्ये रुग्णच पाठवता आले नाहीत. मात्र, मनुष्यबळ, उपकरणे व अन्य साहित्य घेऊन त्यांनी गुंतवणूक केली आहे. करारानुसार त्यांचे पेमेंट देणे गरजेचे आहे. तत्पूर्वी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यांच्या अहवालानुसार खर्च देण्याचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवला होता. त्या समितीच्या भूमिकेवरही आक्षेप असल्याच त्यांचीही चौकशी केली जाईल.'' 

अशी दिली जाईल रक्कम 
कोविड केअर सेंटरला प्रतिदिन प्रतिरुग्ण एक हजार 239 रुपये खर्च देण्याचे निश्‍चित केले होते. त्यात जेवणाचा खर्च 180 रुपये व वैद्यकीय खर्च 100 रुपये, असे 280 रुपये वजा करून उर्वरित रकमेच्या म्हणजेच 959 रुपयाच्या 65 टक्के अर्थात 623 रुपयांप्रमाणे बिल दिले जाणार आहे. आजपर्यंत संबंधितांना तीन कोटी 14 लाख एक हजार 900 रुपये दिले असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी सांगितले. या विषयाचे लेखापरीक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat vs Municipal Council: डोकं फिरवणारं कन्फ्युजन! नगरपंचायत vs नगरपरिषद… नेमका फरक काय? सरळ भाषेत तुलना

Washing Towels Tips: दर आठवड्याला टॉवेल धुणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Municipal Election : तीन वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका; महायुती-महाआघाडीचे काय होणार?

MCA Election Update : मतदार यादीतील घोळ समोर आल्यानंतर निवडणुकीला स्थगिती, उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

Vidarbha Politics: विदर्भातील शहरी क्षेत्रावर प्रभाव कोणाचा?; भाजपा व काँग्रेसमध्येच खरी लढाई; दिग्गज नेत्यांचा कस लागणार..

SCROLL FOR NEXT