bhosari pmpml
bhosari pmpml sakal media
पिंपरी-चिंचवड

Pimpri : भोसरी ते मंचर पीएमपी बस सुरू

सकाळ वृत्तसेवा

भोसरी : भोसरी ते मंचर पीएमपी बस सुरू झाल्याने आनंद होत आहे. ही सेवा एसटी बसपेक्षाही स्वस्त आहे. यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्याांचा प्रवास सुरक्षित होणार असल्याचे मत मंचरमधील भाग्यश्री शिंदे ही विद्यार्थिनी व्यक्त करत होती. तर या बसमुळे रोजच्या प्रवासाची आमची गैरसोय टळणार आहे. पीएमपीची भोसरी ते मंचर ही बस सेवा कायम स्वरुपी राहण्याची मागणी मंचरमधील नागरिक शब्बीर गोलंदाज करत होते.

भोसरी ते मंचर या मार्गावर पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या बसला आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्ये हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. या वेळी नगरसेवक सागर गवळी, राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते योगेश लांडगे, उद्योजक राहुल गवळी, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन अधीकारी चंद्रकांत वर्पे, झोनल अधिकारी संतोष माने, भोसरी डेपोचे व्यवस्थापक रमेश चव्हाण, निगडी डेपोचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे, सहाय्यक डेपो व्यवस्थापक संतोष किरवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भोसरी बीआरटीएसचे प्रमुख काळुराम लांडगे, कामगार नेते कुंदन काळे, गणेश गवळी, तपासणीस सुरेश भोईर, विजय आसादे यांनी केले.

मंचर परिसरातून भोसरी एमआयडीसीबरोबरच चाकणमध्ये येणाऱ्या कामगरांची संख्या प्रचंड आहे. त्याचप्रमाणे मंचर परिसरातून भोसरीसह पिंपरी-चिंचवड परिसरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे मंचर परिसरातून शहर परिसरातील बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे. मात्र मंचरच्या प्रवशांना पीएमपीने खेडपर्यंत प्रवास करावा लागत होता. खेडवरून खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांना वेळेच्या अपव्ययाबरोबरच अर्थिक नुकसानही सहन करावे लागत होते.

बसचे गावागावात स्वागत

पीएमपीची भोसरी ते मंचर बस सेवा सुरू केल्यानंतर या बसचे भोसरी ते मंचरच्या मार्गावर गावोगावी स्वागत करण्यात आले. तर मंचरला सनई चौघड्याच्या निनादात बसचे स्वागत झाले.

दृष्टीक्षेपात भोसरी ते मंचर बस

  • एकूण बसची संख्या - ५

  • एकूण फेऱ्या - ४०

  • एकूण अंतर - ४९.१० किमी

  • भोसरी ते मंचर तिकीट दर - ५०रू

  • मुख्य थांबे - २५

  • एकूण थांबे -८३

भोसरीहून पहिली फेरी - पहाटे ५.३०

भोसरीहून शेवटची फेरी - रात्री १०.१०

मंचरहून पहिली फेरी - सकाळी ६.३०

मंचरहून शेवटची फेरी -संध्याकाळी ७.४०

"पीएमपीची बससेवा खेडपर्यंत असल्याने मंचरला परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होत होती. या बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. या बसच्या फेऱ्या वढविण्याबरोबच ही बससेवा नारायण गावापर्यंत वाढविण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे."

-अॅड. नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

मार्ग पीएमपीचे भाडे (रु.) एसटीचे भाडे (रु.)

भोसरी ते चाकण २० २५

भोसरी ते खेड ३० ४०

भोसरी ते मंचर ५० ६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

SCROLL FOR NEXT