Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात उद्या कोव्हिशिल्डचे २१,५०० आणि कोव्हॅक्सिनचे ३,६०० डोस

पिंपरी महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे २१ हजार ५०० व कोव्हॅक्सिन लशीचे तीन हजार ६०० असे २५ हजार १०० डोस उपलब्ध.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) २१ हजार ५०० व कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचे तीन हजार ६०० असे २५ हजार १०० डोस (Dose) उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था सोमवारी (ता. १३) ७१ केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तनदा माता व गर्भवतींसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर या नऊ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर तीनशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी शंभर डोस पहिला व दोनशे डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

कोव्हिशिल्ड लस ६२ केंद्रांवर दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणीकरून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींना आठ केंद्रांवर लस

गर्भवती व स्तनदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT