Rajesh-Patil
Rajesh-Patil 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : चाचण्यांबरोबर ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर; आयुक्तांची माहिती

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - संभाव्य रुग्णसंख्यावाढ विचारात घेता महापालिका रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनाही सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. अ‍ॅण्टीजेन-आरटीपीसीआर तपासणी प्रमाण वाढविण्याबरोबरच ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, ‘‘आठवडाभरापासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. सध्या दररोज दोन हजार रुग्णांची तपासणी केली जाते. ही संख्या किमान एक हजाराने वाढविण्याचे नियोजन आहे. १८ ते ६० या वयोगटातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक रुग्णामागे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यांचा या पथकात समावेश केला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून १ कोटी ६४ लाख, तर रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून ८ लाख २१ हजार  दंड वसूल केला आहे.

‘ती’ हौसिंग सोसायटी सील
केशवनगर-चिंचवड येथील एकाच हौसिंग सोसायटीत अकरा बाधित आढळून आले, त्यामुळे ही सोसायटी सील केली आहे. मोरया क्रीडांगणासमोरील बाजूस ही सोसायटी आहे. सोसायटीत किराणा मालापासून इतर अत्यावश्यक दुकाने असल्याने मुख्य प्रवेशद्वार महापालिकेने बंद केले आहे. तसेच प्रवेशद्वारावर ‘कोविड प्रतिबंधित क्षेत्र-प्रवेश निषिद्ध’ असा फलक लावला आहे. याशिवाय, १९ ठिकाणे कंन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर केली आहेत.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT