pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : निगडीत होणार भुयारी मार्ग

महापालिका आयुक्तांचा हिरवा कंदील; नागरिकांची सोय होणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गाचे ६१ मीटर रुंदीकरण झाले आहे. त्यात निगडीतील भक्ती-शक्ती व टिळक चौक या अवघ्या पाऊण किलोमीटर अंतरावर दोन उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, रुंदीकरणामुळे निगडीचे दोन भागात विभाजन होऊन बाजारपेठही विभागली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या समोरासमोरील दुकानात जायचे झाल्यास एक किलोमीटरचा वळसा पडत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही पुलांच्या मध्ये भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक व नगरसेवकांनी केली होती.

त्याबाबतच्या रेखांकनावर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर चर्चा केली. नागरिकांची अडचण विचारात घेऊन ती सोडविण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला.

निगडीतील उड्डाणपुलामुळे व महामार्ग रुंदीकरणामुळे स्थानिकांचा अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. गावठाणातील व प्राधिकरणातील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना अधिक त्रास होत आहे. शिवाय, शाळा, बँका, बाजारपेठा, पोलिस चौकी, पोलिस ठाणे, एसटी व पीएमपी बसस्थानकांवर जाणाऱ्या नागरिकांना वळसा घालावा लागत आहे.

त्यामुळे या मार्गावर भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी श्री खंडोबा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, उपाध्यक्ष केतूल सोनिगरा, कार्याध्यक्ष राजेंद्र काळभोर, सचिव राजूशेठ बाबर यांनी केली होती. त्यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक सचिन चिखले, अमित गावडे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका सुमन पवळे, शैलजा मोरे, कोमल घोलप, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर, राजेंद्र बाबर, सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे मागणीबाबत पाठपुरावा केला. त्याबाबत आयुक्तांसमवेत चर्चा झाली. त्यांनी भक्ती-शक्ती ते टिळक चौकातील उड्डाणपुलांदरम्यान भुयारी मार्ग उभारण्यास सहमती दर्शविली व त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाची उभारणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० संघ, ७४ सामने अन् सरावाचे नियम; IPL 2026 मध्ये नेमका काय बदल झाला?

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

कोलेजनचं महत्त्व काय? वाढत्या वयात सुरकुत्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय!

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

SCROLL FOR NEXT