pimpri chinchwad vaccine sakal media
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Corporation : आता घरोघरी जाऊन लसीकरण

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये महापालिका स्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, महापालिका रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘शहरातील १८ वर्षावरील विद्यार्थी, पालक, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे बांधकाम मजूर, भाजी विक्रेते, कागद कचरा गोळा करणारे कामगार, झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक, मोठ्या गृहनिर्माण संस्थेमधील नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता सर्व्हेक्षण करणे, लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, लसीकरण केंद्रे वाढविणे, लसीकरणाचा वेग वाढविणे या संदर्भात वैद्यकीय विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच राज्य शासनामार्फत चालू असलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमे अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांनी कोविड १९ लसीकरण करून घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले. सर्व्हेक्षण व लसीकरणाकरीता महापालिकेतर्फे अधिक मनुष्यबळ व रुग्णवाहिका वैद्यकीय विभागास देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT