Corona Vaccine
Corona Vaccine 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडने लसीकरणाचा केला लाखाचा टप्पा पार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात महापालिकेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या मंगळवारपासून (ता. २३) वाढविण्यात आली आहे. सध्या महापालिकेचे ३८ व खासगी १७ लसीकरण केंद्र सुरू आहेत. महापालिकेचे आणखी १२ केंद्रे पुढील दोन-तीन दिवसांत सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला नोंदणी केलेले आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये लस देण्यात आली. त्यानंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. २४) एक लाख ७ हजार २७ व्यक्तींनी लस घेतली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ह्रदयविकार, पोस्ट कार्डियक ट्रान्सप्लांट, उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफुसाचा विकार, मूत्रपिंड, यकृत, कर्करोग, श्‍वसन विकार, अस्थिमज्जा रोग, एचआयव्ही, बौद्धिक अपंगत्व, शारीरिक व्यंग अशा ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील रुग्णांना लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे.

प्रभागनिहाय लसीकरण केंद्र

  • ‘अ’ प्रभाग - नवीन आकुर्डी रुग्णालय, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, इएसआय हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर
  • ‘ब’ प्रभाग - तालेरा रुग्णालय चिंचवड, किवळे दवाखाना, बिजलीनगर दवाखाना, पुनावळे दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, काळेवाडी शाळा
  • ‘क’ प्रभाग - साईजीवन प्राथमिक शाळा जाधववाडी, इंद्रायनीनगर क्रीडा संकुल, वायसीएम रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, दिनदयाळ शाळा
  • ‘ड’ प्रभाग - पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, पिंपळे निलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, मारुती गेणू कस्पटे शाळा कस्पटे वस्ती वाकड, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, रहाटणी शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे.
  • ‘इ’ प्रभाग - नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, छत्रपती शाहू महाराज विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, चऱ्होली दवाखाना
  • ‘फ’ प्रभाग - संभाजीनगर दवाखाना, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, सेक्टिंग ग्राउंड सेक्टर २१ यमुनानगर, तळवडे समाज मंदिर, प्राथमिक शाळा नंबर ९२ मोरेवस्ती चिखली 
  • ‘ह’ प्रभाग - सांगवी महापालिका शाळा, कासारवाडी दवाखाना 
  • ‘ग’ प्रभाग - यशवंतराव प्राथमिक शाळा थेरगाव, खिंवसरा पाटील शाळा मंगलनगर थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय

नियोजित केंद्र

  • ‘ब’ प्रभाग - गुरुद्वारा वाल्हेकरवाडी
  • क प्रभाग -  खराळवाडी माध्यमिक शाळा व नेहरूनगर उर्दू शाळा
  • इ प्रभाग - मोशी दवाखाना, 
  • ‘ह’ प्रभाग - लोकमान्य टिळक शाळा फुगेवाडी
  • ग प्रभाग - अशोक थियटरजवळील शाळा पिंपरी

शहरातील ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ ते ५९ वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT