MLA Ashwini Jagtap
MLA Ashwini Jagtap Sakal
पिंपरी-चिंचवड

MLA Ashwini Jagtap : चापेकर वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यानुसार विकास करा

सकाळ वृत्तसेवा

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या श्री मोरया गोसावी मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा.

पिंपरी - चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या श्री मोरया गोसावी मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा. तसेच चापेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी गुरुवारी (ता. २३) विधानसभेत केली.

विधानसभेत सन २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत आमदार अश्विनी जगताप यांनी भाग घेतला. त्यावेळी ही मागणी केली.

आमदार जगताप म्हणाल्या की, ‘माझ्या चिंचवड मतदारसंघातील पवना नदीच्या तीरावरील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर हे पुरातन जागरूक देवस्थान असून चिंचवड या ठिकाणी सदगुरू महासाधु श्री मोरया गोसावी यांनी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली असून याला ४६० वर्षे पूर्ण झाले आहेत. राज्यभरातून व शहरातील लाखो भाविक श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी पुण्यतिथी उत्सवाला व दरमहा चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात. श्री मोरया गोसावी मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे, पादुकामंदिर, सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे, मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे आदी कामांकरिता शासनाच्या पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम अंतर्गत निधीची पूर्तता करावी.

चापेकर वाड्याचे ऐतिहासिक महत्व

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एकाच कुटुंबातील तीन भावंडानी दिलेले बलिदान संपूर्ण देशामध्ये एकमेव स्फूर्तीदायक उदाहरण असलेले क्रांतिवीर चापेकर बंधूचा जन्म, बालपण व शिक्षण हे चिंचवडच्या ऐतिहासिक भूमीत झालेले आहे. चापेकर वाड्याला हजारो देशभक्त व पर्यटक भेट देतात. श्री क्षेत्र चिंचवड क्षेत्राचा विकास व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या सहकार्याची व निधीची नितांत आवश्यकता आहे. चिंचवड या धार्मिक व ऐतिहासिक स्थळाचा शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा.

लोणावळा-खंडाळा, कार्ला, या भागाचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता

पुणे जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा खंडाळा राजमाची कार्ला येथे थंड हवेच्या ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. लोणावळा-खंडाळा परिसराचा राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड विसापूर किल्ल्यांचे संवर्धनाची दुरुस्ती, पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे त्याचबरोबर श्री एकविरा माता कार्ला लेणी व शिरगाव साई मंदिर येथे हे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार पर्यटकांसाठी व भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा उभारण्याकरिता निधीची आवश्यकता आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी विशेषत: लोणावळा-खंडाळा, कार्ला या भागाचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत शासनाने नियोजनबद्ध सदर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही अश्विनी जगताप यांनी केल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT