पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो आपण अजूनही सुरक्षित नाही; कोरोनाबाबत पालिका आयुक्तांचे महत्त्वाचे सूतोवाच

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आपण सध्या कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आहोत. त्याचा प्रसार आता आणखी वेगाने होऊ शकतो. त्यामुळे आपण अजूनही सुरक्षित आहोत, असे नाही. आपल्याला आता कोरोनासोबत जगावं लागणार आहे. कारण, लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्याने रुग्ण वाढू लागले आहेत, असे सूतोवाच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. 

कोरोनाची शहरातील सद्यःस्थिती मांडताना आयुक्त म्हणाले, "झोपडपट्टी व दाट लोकवस्तीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. बाधिताना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करावे लागणार आहे. सध्या रुग्ण वाढीचा डबलिंगचा कालावधी सात दिवसांचा आहे. महिन्यात साधारणतः सहा ते सात पट रुग्ण वाढत आहेत. पुढील सहा महिन्यात अडीच हजार रुग्ण असू शकतील, अशी शक्‍यता आहे. एकूण संशयितांपैकी पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण 15 टक्के आहे.'' 

रुग्णालयांतील स्थिती

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेसहाशेपर्यंत पोचली आहे. त्यातील पाच टक्के रुग्ण आयसीयूमध्ये ठेवावे लागत आहेत. संख्या वाढल्यास आणखी व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या 80 टक्के रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे आढळत आहेत. वायसीएममधील रुबी केअरमधील 32 पैकी 24 आयसीयू बेड कोरोनासाठी घेतले आहेत. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना भोसरी रुग्णालयात दाखल केले जात आहे. प्रसंगी ईएसआय व जिजामाता रुग्ण सज्ज ठेवले आहे. बिर्ला रुग्णालयाशी करार केलेला असून त्यानुसार गरोदर महिलांसाठी 30 बेड राखीव ठेवले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड नियंत्रित केलेले असून त्याचा खर्च राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आकारणी केला जाणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकस आहारावर भर

वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल रुग्णांना औषधोपचार व त्यांना सकस आहार पुरविला जात आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स व अन्नपदार्थ पुरविणाऱ्या संस्था बंद होत्या. भाजीपाला मिळत नव्हता. अशा वेळी एका रुग्णाच्या भोजनासाठी 480 रुपये खर्च आला. त्यानंतरच्या काळात हळूहळू भाजीपाला मिळू लागला. अन्नधान्य मिळू लागले. त्या वेळी 225 रुपयांवर खर्च आला. यातही सकस आहारावर भर देण्यात आला. त्यात प्रतिरुग्ण तीन चपात्या, सुकी भाजी, पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ यांचा समावेश होता. अन्नपदार्थ पॅकिंगसाठीच्या एका बॉक्‍ससाठी 13 रुपये खर्च आलेला आहे. एक रुग्ण 14 दिवस उपचार घेत आहे. त्यांना सकाळी नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे. 

रुग्णालयनिहाय आयसीयू

वायसीएम रुग्णालयात आयसीयू 92 बेड आहेत. येथीलच रुबी केअर सेंटरमधील 24 बेड कोरोना बाधितांसाठी घेतली आहेत. वायसीएमच्या प्रसुती कक्षात गरोदर महिलांसाठी 80 बेड आहेत. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात 22 आणि शहरातील खासगी रुग्णालयांतील 80 आयसीयू बेड आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सद्य:स्थितीत रुग्ण

शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 676 झाली आहे. त्यापैकी 401 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 263 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 143 जणांमध्ये कमी तर, 104 जणांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. 16 जण गंभीर आहेत. आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manisha Mhaiskar : मोठी बातमी! कडक शिस्तीच्या मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, तर मिलींद म्हैसकर यांच्याकडे बांधकाम विभाग

IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स

EXCLUSIVE: प्रभूचा कंटेन्ट अश्लील असूनही त्याला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर एकदा वाचाच

Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव बाजार समितीत मक्याला हमीभाव नाही, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT