पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातही होणार आता स्वॅब टेस्टिंग 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी संशयितांच्या घशातील द्रावाची तपासणी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू झाली आहे. या आरटीएफसीआर स्वॅब टेस्टिंग लॅबचे उद्‌घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. 

गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टिंग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे. दररोज 350 ते 400 स्वॅब टेस्टिंग इतकी लॅबची क्षमता आहे. यामुळे संशयित रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल, अशी माहिती महापौर ढोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अँटिजेन किट उपलब्ध झाले आहेत. त्याद्वारे कोरोनाची लक्षणे असणारे तसेच, कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या सुमारे एक लाख व्यक्तींची चाचणी होणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांत या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की, नाही याची माहिती मिळणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या रुग्णांची रोजची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी पद्धतीत रुग्णाच्या घशातील किंवा नाकातील स्त्रावाचे परीक्षण केले जाणार आहे. या अतिविशिष्ट किटद्वारे रुग्णांचे निदान 25 ते 30 मिनिटांत होऊन रुग्णाचा अहवाल मिळणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच, ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत. उदा. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे-यकृत-मूत्रपिंडे अशा अवयवांचे दीर्घकालीन गंभीर आजार, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती, एचआयव्ही बाधित, कर्करोगाची केमोथेरपी घेणारे, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, दम लागणे अशी फ्लूसदृश लक्षणे आहेत, अशा व्यक्ती तसेच जे रुग्ण कोरोना विषाणूच्या आजाराने बाधित आहेत. अशांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची या किटद्वारे चाचणी करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. 

महापालिकेची सर्व झोनल रुग्णालये, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जलद निदान करण्यासाठी लॅबचा वापर करण्यात येणार आहे. अँटिजेन टेस्टिंग रुग्णांना वरदानच ठरणार आहे. जलद गतीने होणाऱ्या चाचण्यांमुळे अधिकाधिक रुग्णांचे निदान होईल. आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण आणि ते मृत्युमुखी पडण्याची संख्या मर्यादित होईल. कोरोना विषाणूची महासाथ नियंत्रणात येण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडेल, अशी आशा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वायसीएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. प्रविण सोनी, डॉ. सतिश पाटील, डॉ. मोकाशी आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT