Pune Sex Racket esakal
पिंपरी-चिंचवड

Pune Crime: पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीला पाहून पोलिसांनाही धक्का

रुपेश नामदास

Pune Sex Racket: मुंबईत मागील काही दिवसांपुर्वी एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून एका प्रसिध्द भोजपुरी अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवताना रंगे हात पकडलं होत. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून त्यामध्ये भोजपुरी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या तिघांनी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. पुणे पोलिसांना पिंपरी-चिंचवड येथी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी या मुलींना जास्त पैशांचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायात अडकवले होते.

या सेक्स रॅकेटचे धागेदोरे लांब पर्यंत असण्याची शक्यता पोलिसांना आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीतील इतर महिलांचाही यात सहभाग आहे का? यासंदर्भात पोलिसांनी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT