Krushna Team eSakal
पिंपरी-चिंचवड

आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं पुन्हा वेशांतर: खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या; पाहा व्हिडिओ

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून ही कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, विश्वास नांगरे पाटील माझ्या ओळखीचे आहेत. आम्ही जमिनीचे मॅटर सॉल करतो, त्यांचीही जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून ही कारवाई केली.

रोशन बागुल , गायत्री बागुल , पूजा माने , ज्ञानेश्वर , अजित हाके अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वेंसेन्ट अलेक्झांडर जोसेफ यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ओळखीचे आहेत, आम्ही जमिनीचे मॅटर सॉल करतो, त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटील हे ओळखीचे आहेत, मी त्यांची जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी रोशन बागूल यांनी केली. तसेच त्याने महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसाचा लोगो असलेले बनावट आय कार्ड तयार केले. पोलिस दलाचा सदस्य असल्याचे भासविले. तसेच फिर्यादीकडे पैशांची मागणी केली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्वतः पोलिस आयुक्तांनी वेषांतर करून निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळील पुना गेट हॉटेल येथे ही कारवाई केली. खंडणीची रक्कम घेताना आरोपींना रंगेहात पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: ''..तर उद्याच शपथविधी'' सुनेत्रा पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

शाहरुख खानला सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यावर, किंग खानने केलं असं काही की... पाहा Viral Video

Body Reset Diet: डाएट आणि फिटनेसचं रुटीन वारंवार बिघडतंय का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘रिसेट डाएट’ करून पाहा

Latest Marathi News Live Update : म्यानमार निवडणुकीत लष्कर-समर्थित USDPचा विजय, गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध

Sangli Election : मतदार शेतात, उमेदवारही शेतात; पलूसमध्ये प्रचाराचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT