crime sakal
पिंपरी-चिंचवड

पुण्यातील 'त्या' बाप -लेकासह पाच जणांवर मोका

कट रचून बनावट कागद्पत्राद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर या बाप-लेकासह त्यांच्या टोळीवर दाखल आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुण्यातील बडे उद्योजक म्हणून मिरवणाऱ्या बाप-लेकासह पाच जणांवर पिंपरी - चिंचवड (pimpri chinchwad) पोलिसांनी (police) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (mcoca) कारवाई केली. कट रचून बनावट कागद्पत्राद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर या बाप-लेकासह त्यांच्या टोळीवर दाखल आहेत. (pimpri chinchwad police to pune businessman and five other action mcoca)

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघेही रा. आयटीआय रोड, औंध) असे या उद्योजक बाप-लेकाचे नाव असून त्यांच्यासह गणेश ज्ञानेश्वर साठे (वय ३५, रा. पिंपळे निलख), राजू दादा अंकुश (रा. गल्ली क्रमांक १, पिंपळे गुरव), दीपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे) यांच्यावरही मोकाची कारवाई झाली आहे. या आरोपींवर दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे असे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगवी, हिंजवडी, चतुःशृंगी, चंदननगर, पौड पोलिस ठाण्यात या गुन्हयांची नोंद झालेली आहे.

हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसर त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (ता. ३) कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, गणेश व नानासाहेब या बाप लेकासह इतर आरोपींनी औंधसह परिसरातील काही जमीन प्रकरणात केलेल्या उद्योगांबाबत गुन्हेही दाखल आहेत. या उद्योजक बाप-लेकाने जमीन व्यवहारासह इतर उद्योगातून परिसरात प्रस्थ निर्माण केले. त्यांचे बड्या राजकीय नेत्यांशी हितसंबंध असल्याचेही बोलले जाते. दरम्यान, ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT