Sakal Vidya Expo 2023 sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Edu Expo : करिअर मार्गदर्शनासाठी विद्यार्थी व पालकांना चिंचवडमध्ये ‘सकाळ एज्यु एक्स्पो' चे आयोजन

दहावी बारावीनंतर आता पुढे काय? असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहेत. त्यांचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - बारावीचा निकाल लागला आहे. बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी घेतलेल्या ‘सीईटी’चा निकाल १३ जूनला लागणार आहे. शिवाय, काही दिवसांत दहावीचा निकालही लागणार आहे. त्यामुळे आता पुढे काय? असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहेत. त्यांचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, करिअरबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळावे, एकाच छताखाली सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती व्हावी. यासाठी ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२३’चे आयोजन १७ व १८ जून रोजी चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे.

दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यासह पालकांच्या मनात चिंता आहे. मार्क्स किती मिळतील. टक्के किती असतील. त्यानंतर कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? काहींनी ठरवलेलंही असेल. ‘यात’ नाहीत तर, ‘त्यात’ असे पर्यायही मनात असतात. ‘निकाल लागल्यावर बघू’, असंही काहींचं म्हणणं असतं. काहींना करिअर बाबत कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं?, असाही प्रश्न पडलेला असतो.

या सर्व किंतु, परंतुवर लवकरच एक सोल्युशन येत आहे आणि ते घेऊन येत आहे, तुमचा, आमचा, आपला ‘सकाळ.’ होय! अगदी खरंय, दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘सकाळ’ मार्गदर्शन घेऊन येत आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शनाची संधी मिळवा, तीही अगदी अमूल्य!

काय? कधी? केव्हा? कुठे?

काय? - सकाळ एज्यु एक्स्पो

कधी? - १७ व १८ जून २०२३

केव्हा? - सकाळी १० ते रात्री ८

कुठे? - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

काय सांगता?

- आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय

- दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा

- शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली

- विविध क्षेत्रातील करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नाव नोंदणीसाठी

संपर्क - ८३७८९८७८३६

लिंक - https://forms.gle/GqHqaNiy5HbUi3uG7

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT