School
School Sakal
पिंपरी-चिंचवड

कुणी शाळा विकत घेता का शाळा!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) पुणे जिल्ह्यातील (Pune District) इंग्रजी माध्यमातील अनेक शाळा (English medium School) अडचणीत (Problem) सापडल्या आहेत. गेल्या वर्षापासून अनेक शाळा बंद (School Close) आहेत. त्यात आवक बंद आणि खर्च (Expenditure) सुरू असल्याने जमा-खर्चाचे गणित बिघडले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २४०, तर पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) ६३ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील काही शाळा हस्तांतरित किंवा विक्रीला काढण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्याबाबत काहींनी शिक्षण विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. (Pimpri Chinchwad School Issues by Coronavirus and Lockdown)

शहरात ६२५ शाळा आहेत. अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्याही वाढली. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. पण, कोरोनामुळे शाळांची परिस्थिती दयनीय झाली आहे. एकीकडे वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क, पुस्तके, गणवेश यांच्या माध्यमातून वसुली करून शाळा गब्बर झाल्या आहेत, तर दुसरीकडे कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा, असा प्रश्‍न अनेक संस्था चालकांसमोर आहे. ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. मात्र, त्या देखील काही दिवसच चालवता आल्या. मालकीची इमारत नसलेल्या शाळांना भाडे देणे आवश्यक आहे. मिळकत नसल्याने भाडे कसे द्यावे? त्यात शिक्षकांचे पगार कसे भागवावेत असे असंख्य प्रश्‍न संस्थाचालकांना सतावत आहेत.

अनेक शाळा पडल्या बंद

शहरातील काही शाळांनी शिक्षण विभागाकडे शाळा बंद करत असल्याबद्दल पत्रव्यवहार केला आहे. मोशी, आकुर्डी, सांगवी, चिखली, रावेत या परिसरातील काहींनी शाळा बंदच केल्या आहेत. हीच परिस्थिती राहिली, तर त्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेकांनी शाळा इतर लोकांना हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलग दोन वर्षे काही पालकांना शुल्क जमा करता आले नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्यास सवलत दिली. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, त्यामुळे त्यांना शुल्क भरणे शक्य झाले नाही. परिस्थिती असूनही काही पालकांनी शुल्क न भरल्यामुळे या शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. शिक्षकांचे पगार, इमारतीचे भाडे कुठून द्यावे, आदी प्रश्‍न उभे ठाकले आहेत.

- राजेंद्र सिंग, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT