पिंपरी-चिंचवड

कुत्र्यांच्या हल्ल्यांवरून प्रशासनावर हल्लाबोल;स्थायी समिती सभेत चर्चा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे. झुंडीने कुत्रे फिरत असून, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या बंदोबस्ताचे काय? किती कुत्री रोज पकडली जातात? त्यांच्यावर निर्बिजिकरण व संतती नियमन शस्त्रक्रिया किती प्रमाणात केल्या जातात? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत स्थायी समिती सभेत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान, कुत्र्यांबाबतच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यावर चर्चा झाली. 

शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य रस्त्यांसह महामार्गावरही झुंडीने कुत्री फिरताना दिसत आहेत. पादचारी व दुचाकीस्वारांवर त्यांच्याकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार महिन्यात हिंजवडी रस्ता, वाकड, पिंपळे निलख, सांगवी, दिघी, मोरवाडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर आदी भागांमध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्यांवर निर्बिजिकरण व संततीनियमन शस्त्रक्रिया नियमितपणे केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या बाबत महापालिका स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावर, प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे म्हणाले, ""मोकाट कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एजन्सी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलंय? कारण आलं समोर, शिंदेसेनेच्या नेत्यानंच सांगितली आतली बातमी

Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दादर ते जेएनपीटी नवा मार्ग सुरू होणार; लोकलला मोठा दिलासा, पण कधीपासून?

IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

अमिर खानच्या लेकासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करणार, 'एक दिन' सिनेमाचा टीझरमधून वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

SCROLL FOR NEXT