Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लशीचे २०,४०० डोस

कोरोना प्रतिबंधक लशीचे २० हजार ४०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे १८ हजार ६०० व कोव्हॅक्सिन लशीचे एक हजार ८०० डोस आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लशीचे २० हजार ४०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे १८ हजार ६०० व कोव्हॅक्सिन लशीचे एक हजार ८०० डोस आहेत. ते देण्याची व्यवस्था अनुक्रमे ६२ व नऊ अशा ७१ केंद्रावर गुरुवारी (ता. १६) केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तनदा माता व गर्भवतींसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

कोव्हॅक्सिन लस ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर या केंद्रांवर दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोनशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी शंभर डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. सर्व केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस उपलब्ध आहेत. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींना आठ केंद्रांवर लस

गर्भवती व स्तनदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevrao Mahadik Sugar Factory : आप्पा महाडिकांच्या कर्नाटकातील बेडकिहाळ साखर कारखान्याचा दर ठरला, सरकारने दिलेल्या दरापेक्षा ५० रुपये देणार जादा

Maratha Community: 'मंगळवेढा सकल मराठा समाज आक्रमक'; मनोज जरांगे-पाटील हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा

Karuna Munde: करुणा मुंडेंचा पक्ष निवडणुका लढविणार; संभाजीनगरात दिली माहिती, मराठवाड्यात उभे करणार उमेदवार

US Soldiers: ४०,००० अमेरिकन सैनिक समुद्रात गायब! शास्त्रज्ञ घेत आहेत शोध, नेमकं काय घडलं?

Pratap Sarnaik : मिरा-भाईंदरचा भूखंड नियमानुसारच घेतला; वडेट्टीवारांच्या आरोपांवर परिवहनमंत्र्यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT