Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : प्रारूप प्रभाग रचनेसाठी पिंपरीत समिती नियुक्त

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना (वार्ड) करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना सूचना केली होती. त्यानुसार, कार्यवाही सुरू झाली असून आयुक्त राजेश पाटील यांनी २५ अधिकाऱ्यांची सोमवारी समिती नियुक्त केली.

महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी नियुक्त समिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे. शहराच्या उत्तरेकडून ईशान्येकडे, त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे नैसर्गिक स्त्रोत, रस्ते, नाले, पूल, नदी, लोहमार्ग, महामार्ग विचारात घेऊन रचना केली जाणार आहे.

शेवटचा प्रभाग दक्षिणेकडील असेल. प्रभाग रचना करताना गोपनीयता पाळावी, काम वेळेत पूर्ण करावे, नियमांचे काटेकोर पालन करावे, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान, २०१७ च्या रचनेनुसार शहरात चार सदस्यीय वॉर्ड आहे. त्यांची संख्या ३२ असून नगरसेवकांची संख्या १२८ आहे.

नवीन वॉर्ड रचनेसाठी २०११ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्‍चित केली जाणार आहे. मात्र, नगरसेवकांची संख्या १२८च राहणार आहे. म्हणजेच १२८ वॉर्ड तयार केले जाणार आहेत. मात्र, मतदार संख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या प्रभागनिहाय वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

PM Modi: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : किरीट सोमय्यांचा डीपफेक फोटो व्हायरल; तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT