Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शुक्रवारी कोव्हिशिल्डचे ३२,३००; कोव्हॅक्सिनचे २,८०० डोस उपलब्ध

कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे २,८०० आणि कोव्हिशिल्ड लसीचे २९ हजार ५०० असे ३२ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे २,८०० आणि कोव्हिशिल्ड लसीचे २९ हजार ५०० असे ३२ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (ता. ८) अनुक्रमे आठ व ५९ अशा ६७ केंद्रावर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर तीनशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी ५० डोस पहिला व अडीचशे डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT