Mohitraje Bhosale Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Crime : बंगल्याची सिमाभिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

बंगल्याची सिमाभिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिखली गावठाण येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

बंगल्याची सिमाभिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिखली गावठाण येथे घडली.

पिंपरी - बंगल्याची सिमाभिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिखली गावठाण येथे घडली.

मोहितराजे अमित भोसले (रा. देहू-आळंदी रोड, चिखली गावठाण ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील अमित भोसले यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश विठ्ठल जाधव (रा. स्पाईन रोड, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचा चिखली गावठाण येथे बंगला असून या बंगल्याची सात ते आठ फूट उंचीची सिमाभिंत एका बाजूला झुकलेली होती.

दरम्यान, मोहितराजे हा भिंतीलगतच्या रस्त्याने जात असताना ही भिंत त्याच्या अंगावर कोसळली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही भिंत दुरुस्त करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, मोहीतराजे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी जाधव याला अटक केली आहे.

मोहितराजे निगडीतील एका खासगी शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. वडील चिंचवड येथील खासगी रुग्णालयात नोकरीला असून आई गृहिणी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आईच्या डोळ्यासमोरच घडली घटना

घटनास्थळापासून काही अंतरावरच भोसले कुटुंब राहते. भिंत कोसळली यावेळी काही अंतरावरच मोहितराजे याची आई होती. पोटचा गोळा ढिगाऱ्याखाली अडकल्याचे पाहिल्यानंतर आईने टाहो फोडला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोहितराजे याला तात्काळ बाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT