pimpri cinchwad municipal corporation sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, सध्या बाधितांची घटती संख्या पाहता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी दिली.

महापालिकेमध्ये कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेचे ६ हजार २०० सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी अर्जही

दाखल झाले होते. परंतु, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याने निवडणूक पुढे ढकलली होती. शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शुक्रवारी (ता.११) अंतिम उमेदवार यादी करण्यात आली.

पॅनेल प्रमुखांची निवड व चिन्ह वाटप १४ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. तर, महापालिका भवनात २५ फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी सांगितले.

असा असेल कार्यक्रम

तारीख - कार्यक्रम

  • १४. - पॅनेल प्रमुखांची निवड व चिन्ह वाटप

  • २५. - मतदान

  • २५ - मतमोजणी व मतमोजणीचा निकाल जाहीर करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! उच्चांकापासून 25 हजारांनी घसरण; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Pahalgam: कटू स्मृतींच्या वेदनांना अंत नाही; पीडितांच्या दुःखाला पारावार नाही; पर्यटन थांबल्याने स्थानिकांची रोजीरोटी हिरावली

Latest Marathi News Live Update : लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे बुलडाण्यात २ तरुणांची आत्महत्या

नारी शक्तीच भाजपला सत्तेतून हाकलून लावेल; महिलेनं मंत्री महाजनांना झापल्यानंतर विरोधकांनीही घेरलं

Pahalgam Attack: संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची अदृश्य वेदना; दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींनी झोप हरवलेली, घरात अजूनही शांतता नाही

SCROLL FOR NEXT