crime
crime sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : भरदिवसा घरातून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना भरदिवसा काळेवाडी येथे घडली. दरम्यान, या घटनेतील चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी वरून शशिकुमार पिल्ले (रा. राजवाडेनगर, कॉलनी क्रमांक ३, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. २३ सप्टेंबरला सकाळी पावणे आठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे वडील जिमला गेले होते. तर त्यांचा भाऊ व वहिनी गावी गेले होते. घरात त्यांची आई व आजी होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असताना चोरटा उघड्या दरवाजावाटे घरात शिरला. त्याने घरातील तिन्ही बेडरूममधील लोखण्डी व लाकडी कपाट उचकटून त्यातील एक लाख ७६ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. काही वेळानंतर ही बाब फिर्यादी यांच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने फिर्यादी मुलाला घरी बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पोलिसाना कल्पना दिली.

दरम्यान, हा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामध्ये खांदयावर टॉवेल घेतलेला हा चोरटा परिसरातील घरे हेरत असल्याचे दिसून येते. त्यानंतर फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघड बघून तो आत शिरला. तसेच ऐवज घेतल्यानंतर पळत जातानाही तो दिसून येत आहे. या चोरट्याने परिसरातही चोरी केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्या आधारावर वाकड पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT