मुंबई आणि नाशिक महामार्ग
मुंबई आणि नाशिक महामार्ग sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : मुंबई आणि नाशिक महामार्ग ‘ब्लॉक’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. त्यानंतर चालक व मदतनीस निघून गेले. त्यामुळे अन्य वाहनचालकांना मागे फिरून जावे लागले. शिवाय, पोलिस शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. दहाच्या सुमारास कंटेनर काढायला सुरुवात झाली. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर ऑइल सांडल्याने एमआयडीसीतून वाहतूक वळवावी लागली. त्यामुळे कोंडी झाली होती. परिणामी, शनिवारी मुंबई व पुणे दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. पिंपरीतील कोंडीत चार रुग्णवाहिकांना अडकल्याने त्यांना वाट करून देताना पोलिसांना कसरत करावी लागली.

समन्वयाचा अभाव

ग्रेडसेपरेटरमध्ये कित्येकदा क्षमतेपेक्षा अधिक उंचीची वाहने व अवजड मालाची वाहने प्रवेश करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर वाहतूक कोंडी ओढवते. ग्रेडसेपरेटमध्ये वाहने अडकून छताचा भागही निखळण्याची भीती आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या असमन्वयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र, त्रास सहन करावा लागत आहे.

१३ तास अडकला कंटेनर

पिंपरीतील ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने निगडीकडे जाणारी सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली, त्यामुळे दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांनी कंटेनरच्या चाकांमधील हवा सोडली. तरीही कंटेनर बाहेर निघाला नाही. सलग १३ तास कंटेनर अडकून राहिला. अखेर क्रेनने कंटेनर बाहेर काढला. परंतु, तोपर्यंत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते. एक रुग्णवाहिका पिंपरी कॅम्पच्या व इतर रुग्णवाहिका सिग्नलहून चिंचवडच्या दिशेने गेल्या.

पंधरा दिवसांत दोन वेळा कंटेनर ग्रेडसेपरेटरमध्ये अडकले आहेत. नाशिकफाटा आणि निगडी दोन्ही बाजूच्या ग्रेडसेपरेटला ४.५ मीटर वाहनांच्या उंचीचे बॅरिकेड्स गरजेचे आहे. महापालिकेसोबत पत्रव्यवहार करणार आहे. कंटेनर अडकल्यानंतर नागरिकांनी ग्रेडसेपरेटरमध्ये न थांबवता वाट काढून जायला हवे होते.

- राजेंद्र कुंटे, वाहतूक पोलिस निरीक्षक, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT