murder
murder sakal
पिंपरी-चिंचवड

माझ्या रूममध्ये खून झालाय; मालकाला मेसेज करत तरुणीचा खून

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आतेभावानेच तरुणीचा खून केला. यानंतर पसार झालेल्या या आरोपीने 'माझ्या रूममध्ये खून झाला आहे, तुम्ही सकाळी लवकर या, कुलूप तोडा, पोलिसांना सांगा, असा मेसेज घरमालकाच्या मोबाईलवर केला. घटनास्थळी पाहणी केली असता तरुणीचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या आरोपीला निगडी पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली.

रितू भालेराव (वय २०, रा. विठ्ठलवाडी , आकुर्डी, मूळ - औरंगाबाद ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर शाम राजू डेरे (वय २४, रा. शाहपूर दाढेगाव, जालना) असे अटक केलेल्या आत्येभावाचे नाव आहे. याप्रकरणी घरमालक प्रथमेश दीपक दरेकर यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शाम हा रितूच्या वडीलांच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. १३ सप्टेंबर २०२१ ला शाम व रितू यांनी पती-पत्नी असल्याचे सांगून दरेकर यांची खोली भाड्याने घेतली होती. दरम्यान, शामने घरमालक दरेकर यांना रात्री सात मॅसेज केले.

त्यामध्ये 'माझ्या रूममध्ये खून झाला आहे, तुम्ही सकाळी लवकर या, कुलूप तोडा, पोलिसांना सांगा', असे मेसेजमध्ये नमूद होते. दरम्यान, रविवारी (ता. ६) सकाळी दरेकर खोलीजवळ आले असता खोलीतून उग्र वास येत होता. यामुळे पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बंद दरवाजा उघडला. त्यानंतर खोलीतील स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडल्यानंतर रितूचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

पोलिसांनी पथके रवाना करून औरंगाबाद येथून शाम याला जेरबंद केले. हा खून नेमका कोणत्या कारणावरून केला, हे स्पष्ट झालेले नाही. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT