pcmc 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : अंध-अपंगांसाठीची राखीव जागा भाड्यानं; पालिकेच्या उत्पन्नात तीन लाखांची भर

सकाळ डिजिटल टीम

पिंपरीतील क्रोमा इमारतीशेजारील अंध-अपंगासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या वाहनतळाची जागा ११ महिने भाड्याने देण्यात येणार आहे. भाड्यापोटी महापालिकेला ३ लाख ९० हजार रुपये भाडे मिळणार आहे. महापालिकेच्या जागा आणि इतर मालमत्ता ११ महिन्यांसाठी भाडे तत्वावर देण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार

'ह' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी येथील क्रोमा इमारतीशेजारी महापालिकेची वाहनतळाची जागा आहे. ही जागा अंध व अपंगासाठी राखीव असून या वाहनतळाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १,३५० चौरस मीटर असून, त्यामध्ये ५४ दुचाकी आणि ३५ चारचाकी वाहनं पार्किंगची क्षमता आहे. 

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

ही वाहनतळाची जागा सीमाभिंतीसह प्रवेशद्वारासह बंदिस्त करण्यात आली आहे. नगररचना विभागाने मासिक ‘ह’ क्षेत्रीय भागासाठी भाडेदर ९.२० चौरस फूट निश्चित केला आहे. या वाहनतळाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार ५२६ चौरस फूट आहे. त्यानुसार, दर निश्‍चिती केल्यास मासिक भाडे १ लाख ३३ हजार ६३९ रुपये अधिक जीएसटी असे १ लाख ५७ हजार रुपये इतकं होतं. 

निविदेसाठी ३ लाख ३० हजार रुपयांची सर्वोच्च बोली

वाहनतळ ११ महिन्यांकरीता भाड्याने देण्यासाठी 'ह' क्षेत्रीय कार्यालयामार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये सहा व्यावसायिकांनी सहभाग घेतला. त्यात महापालिकेने जाहीर केलेल्या निविदेच्या दरापेक्षा औंध येथील राजीव काटे यांनी ३ लाख ३० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असा इतरांपेक्षा अधिक दर मांडला. त्यानुसार याचं कंत्राट काटे यांच्याकडं गेलं असून त्यांनी ३ लाख ३० हजार रुपये अधिक जीएसटी आणि चार महिन्यांची अनामत १ लाख २० हजार रुपये, अशी ५ लाख १ हजार ४०० रुपये रक्कम आगाऊ भरली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT