krishna prakash sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : तृतीयपंथीयांवर आता ग्रामसुरक्षेची जबाबदारी - कृष्ण प्रकाश

तृतीयपंथी म्हटले, की सिग्नलवर, बसमध्ये, रेल्वेत पैसे मागणारे, त्रास देणारे, अशी प्रतिमा डोळ्यांसमोर चटकन उभी राहते.

सकाळ वृत्तसेवा

तृतीयपंथी म्हटले, की सिग्नलवर, बसमध्ये, रेल्वेत पैसे मागणारे, त्रास देणारे, अशी प्रतिमा डोळ्यांसमोर चटकन उभी राहते.

पिंपरी - तृतीयपंथी (Eunuch) म्हटले, की सिग्नलवर, बसमध्ये, रेल्वेत पैसे मागणारे, त्रास देणारे, अशी प्रतिमा डोळ्यांसमोर चटकन उभी राहते. मात्र, समाजाने नाकारलेल्या या तृतीय पंथीयांवर ही वेळ का आली, याचा विचार केला जात नाही. त्यांच्या समस्या जाणून न घेता त्यांना पावलोपावली झिडकारले जाते. त्यांना दिशा देणारे, आपलेसे करणारे कोणीतरी हवे असते. हीच बाब ओळखून या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांना रोजगाराची (Employment) संधी उपलब्ध करून देत पोलिस मित्र म्हणून त्यांना आता ग्रामसुरक्षेचीही जबाबदारी दिली जाणार आहे.

अगोदर कुटुंबाने व नंतर समाजाने नाकारलेले अनेक तृतीयपंथी त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी ठिकठिकाणी पैसे मागताना दिसतात. काही जण गुन्हेगारीकडे वळतात. अशातही अनेकजण सन्मानाने जगण्यासाठी व आपले अधिकार मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते. मात्र, समाज स्वीकारत नसल्याने नाइलाजास्तव भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येते. या घटकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते देखील स्वयंपूर्ण होतील. त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येणार नाही.

दरम्यान, शहरात घडलेल्या काही घटनांमध्ये तृतीयपंथी आरोपी असल्याचे समोर आले. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुढाकार घेत तृतीय पंथीयांसाठी शिबिराचे आयोजन केले. यामध्ये त्यांच्या अनेक समस्या, अडचणी जाणता आल्या. त्यावर मार्ग काढण्यासह त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाहीही सुरू झाली. त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी पोलिसांतर्फे नियोजन केले जाणार आहे. यामुळे तृतीय पंथीयांनी समाधान व्यक्त केले. समाजाचे रक्षक असलेल्या पोलिसांनी आम्हाला मोठे पाठबळ व छत्र दिले आहे. समाजात चांगले स्थान मिळेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

तृतीयपंथी ग्रामसुरक्षा दलात काम करू शकतात, यासाठी त्यांनी तयारी दर्शविलेली आहे. त्यांचे काही लोक यामध्ये घेणार आहोत. तसेच आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये महिलांच्या प्रश्नांबरोबरच तृतीय पंथीयांचेही प्रश्न सोडविले जातील.

- कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त

आम्हाला सन्मान नको, सत्कार नको; पण आम्हाला स्वीकारा, आम्हाला आमचा अधिकार द्या, हे आम्हाला समाजाला सांगायचंय. केवळ आम्ही तृतीयपंथी म्हणून आम्हाला नाकारले जाते.

- तृतीयपंथी

आमच्या समस्या कोणीही जाणून घेत नाहीत, अशा उपक्रमांमुळे निश्चितच बदल घडेल. आपणही समाजाचा घटक आहोत, असा आत्मसन्मान निर्माण होईल. पोलिस मित्र बनून ग्रामसुरक्षेची मिळालेली संधी आनंद देणारी आहे.

- एक तृतीयपंथी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flight Bomb Threat: कुवेत–दिल्ली इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; अहमदाबादमध्ये तातडीचे लँडिंग

Sangli Turmeric : राजापुरी हळदीच्या दराने गाठला उच्चांक; यंदाचा हंगाम फायदेशीर ठरण्याचे संकेत

Indian Rock Python : कोयना जलाशयात १० फुटी अजगर; पर्यटकाने टिपला व्हिडिओ; इंडियन रॉक पायथॉन प्रजातीची चर्चा

Mumbai News : मुलाने वडिलांना मृत घोषित करण्यासाठी दाखल केली याचिका; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल!

Latest Marathi News Live Update : हार्बर मार्गावर गाड्या 30 ते 35 मिनिटं उशिरा; स्थानकांवर गर्दी

SCROLL FOR NEXT