esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वीजबिलापोटी ९४ कोटींची थकबाकी

वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. सद्यःस्थितीत शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख ९ हजार ८५२ ग्राहकांकडे ९४ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे.

दरम्यान, सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व चालू वीजबिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र रविवारी (ता. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in

वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती एक लाख ७५ हजार ९६८ ग्राहकांकडे ५८ कोटी ८५ लाख, वाणिज्यिक २८ हजार २०० ग्राहकांकडे २३ कोटी ९४ लाख व औद्योगिक पाच हजार ६८४ ग्राहकांकडे ११ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT