प्लॅस्टिकचा तांदूळ  SAKAL
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शालेय पोषण आहारात प्लॅस्टिकचा तांदूळ

तांदळामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ मिळत असल्याचा प्रकार महापालिकेच्या चिंचवड - केशवनगर शाळेत उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेत वाटप करण्यात येत असलेल्या तांदळामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ मिळत असल्याचा प्रकार महापालिकेच्या चिंचवड - केशवनगर शाळेत उघडकीस आला आहे. नियमित तांदळापेक्षा या तांदळाचे वजन कमी असल्याने तो पाण्यावर तरंगताना दिसून येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे.

कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना पोषण आहार शिजवून देण्याऐवजी कोरडा तांदूळ वितरित केला जात आहे. नियमित तांदळापेक्षा या तांदळाचे वजन कमी असल्याने तो पाण्यावर तरंगताना दिसून आल्‍यावर काही पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे तक्रार केली. त्यांनी शाळेत पुराव्यानिशी शाळेत पोषण आहार अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या तांदळाची भेसळ उघडकीस आणली. या तांदळात मोठ्या प्रमाणात (केमिकल मिक्स तांदूळ ) आढळून आल्याची माहिती सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे व उपशहर अध्यक्ष अनिकेत प्रभू यांच्याकडे केली. सर्व प्रकार केशवनगर शाळेचे शिक्षक चपटे यांच्या समोर उघडकीस आणला यांनी ही भेसळ मान्य केली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोट

‘‘शहरात योजनेअंतर्गत वितरित केलेला तांदूळ प्लास्टिक तांदूळ असल्याचा तक्रारी पोषण आहार स्वतंत्र कक्षाला अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच या तांदळाचे नमुने संकलित करून प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येईल. तसेच याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडून देखील अभिप्राय घेण्यात येतो. त्यासाठी मुख्याध्यापक व पालकांनी तक्रार केली पाहिजे.’’

-सचिन देशमुख, समन्वयक शालेय पोषण आहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin India visit: पुतीन यांच्या स्वागताला मुंबईचा पांढरा हत्ती! मोदींनी का निवडली टोयोटा फॉर्च्यूनर?

Marathi Breaking News LIVE: शनीशिंगणापूर देवस्थानचे दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी केली अटक

भीषण अपघात! खासगी बसची उभ्या असलेल्या ट्रकला धडक...दोघांचा जागीच मृत्यू, १८ प्रवासी जखमी

Hardik Pandya: विकेट घेतल्यानंतर रवी बिश्नोई सेलिब्रेशन करत होता, तेव्हा बाद झालेल्या हार्दिकने काय केले ते पाहा.. Video Viral

Nagpur Scam: ट्रेडिंगच्या बहाण्याने एक कोटीने फसवणूक; सदर पोलिसाकडून पाच ठकबाजांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT