corona vaccination sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शहरात मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी कोविड लसीकरण

वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी लाभार्थ्यांना कोविडचा पहिला व दुसरा डोस महापालिकेच्या प्रभागवार पद्धतीने कोविड लस देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी लाभार्थ्यांना कोविडचा पहिला व दुसरा डोस महापालिकेच्या प्रभागवार पद्धतीने कोविड लस देण्यात येणार आहे. ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस मंगळवारी (ता. १२) ते गुरुवारी (ता. १४) या दरम्यान ९ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन ७ हजार २०० प्रमाणे लस मिळणार आहे.

लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पद्धतीने ५० टक्के लाभार्थी या पद्धतीने देण्यात येणार आहे. लसीकरणाचा कालावधी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत असणार आहे. या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोसेस मंगळवारी (ता.१२), बुधवारी (ता. १३) आणि गुरुवारी (ता.१४) रोजी ८ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन २८०० प्रमाणे कोविड लसी देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४०० कोविड डोस पहिल्या डोससाठी राखीव असून त्यातील कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने २०० डोसेस तर उर्वरित २०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे. त्यांनी महापालिका वार्डनिहाय केंद्रीय किओक्स टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

सर्व लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी महापालिका वार्डनिहाय केंद्रीय किओक्स टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. ता.१२ ते १४ ऑक्टोबरसाठी कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी उद्या (ता. १२) रोजी सकाळी ८.०० वाजण्यापूर्वी स्लॉट बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT