covid vaccine sakal media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शहरात आज ६५ केंद्रांवर लसीकरण

शहरातील ६५ केंद्रांवर गुरुवारी (ता. २५) कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः शहरातील ६५ केंद्रांवर गुरुवारी (ता. २५) कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हॅक्सिनचे दोन हजार ८०० व कोव्हिशिल्डचे २८ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

कोव्हॅक्सिन लस ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येकी ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जाणार आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल.

आठ केंद्रांवर ११ तास

महापालिकेचे कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

लसीकरण केंद्र...

  • कोव्हॅक्सिन ः ८

  • कोव्हिशिल्ड ः ५७

  • एकूण ः ६५

  • लशींचे उपलब्ध डोस

  • कोव्हॅक्सिन ः २८,५००

  • कोव्हिशिल्ड ः २,८००

एकूण ः ३१,३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT