पिंपरी-चिंचवड

आरटीई नोंदणीस शाळांचा "ठेंगा' 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दुर्बल, वंचित व दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यास शाळांनी ठेंगा दाखवला आहे. 21 जानेवारीपासून शाळा नोंदणीला सुरवात असून आजअखेरच्या 14 दिवसांत अवघ्या 18 शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणीबाबत शाळांची उदासिनता पाहून शिक्षण संचलनालयाने नोंदणीला 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

गेल्यावर्षी शहरातील 176 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली होती. यावर्षी मात्र सुरवातीलाच पिंपरी विभागांतर्गत 13 तर आकुर्डी विभागांतर्गत फक्त 5 शाळांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारीला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे, यासाठी प्रशासनाने मुख्याध्यापकांची बैठक घेतली, त्यात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तरीही शाळांचा प्रतिसाद दिसून येत नाही. यामुळे आता यावर्षी किती शाळांची नोंदणी होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : शेतकऱ्याच्या मुलाचा संघर्षमयी प्रवास ! कधी काळी गुरे राखणारा दिनेश झाला अधिकारी; कोचिंगशिवाय तीनदा परीक्षा उत्तीर्ण

Uttar Pradesh Government: गोमती नदीत सोडली ५० हजार माशांची पिल्ले; मत्स्यसंपदा वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा पुढाकार

अंजनारी घाटात भीषण अपघात, RTOच्या गाडीला ट्रकची धडक; ASIसह दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

Shivaji Maharaj : दुष्काळात शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? ३५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आदेश!

Latest Marathi News Update : भारतात अराजकतेसाठी चीन पैसे देतंय, राहुल गांधी परदेशात जातायत; फडणवीसांचा घणाघात

SCROLL FOR NEXT