Women Antigen Test Sakal
पिंपरी-चिंचवड

पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी अडविले, अन्‌ ‘ती’ पॉझिटिव्ह निघाली

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी अडविले. अँटिजेन तपासणी करण्यास सांगितले असता पती तयार झाला. मात्र, पत्नीने भीतीपोटी नकार दिला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी (Police) नाकाबंदीच्या ठिकाणी अडविले. अँटिजेन तपासणी (Antigen Test) करण्यास सांगितले असता पती तयार झाला. मात्र, पत्नीने भीतीपोटी नकार दिला. माझी तब्येत ठीक आहे, मला काहीही झालेले नसल्याचे सांगत महिला (Women) रडू लागली. परंतु, तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगत तपासणीने काहीही होत नाही, हे पटवून देण्यासाठी एका छोट्या मुलाची तपासणीही करून दाखवली. अखेर महिला तपासणीसाठी तयार झाली अन तपासणीत त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला. हे समजल्यानंतर दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, वेळीच निदान झाल्याने ‘त्या’ महिलेच्या पतीने डॉक्टर व पोलिस प्रशासनाचे आभार मानले. हा प्रसंग आहे पिंपरी कॅम्पातील. (Police Blocked Road Blockade and Women Turned Positive)

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत असून, प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. पोलिस व महापालिका, जिल्हा परिषदेच्या पथकाकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बाहेर पडणाऱ्यांची धरपकड करून चौकशी केली जात असून, अत्यावश्यक काम नसलेल्यांची जागेवरच रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली जात आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु काही ठिकाणी नागरिकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी ही तपासणी केली जात आहे. यासाठी महापालिका हद्दीत पोलिस व महापालिकेची सहा पथके तर ग्रामीण हद्दीत पोलिस व जिल्हा परिषदेची तीन पथके तैनात केली आहेत. यामध्ये एक पोलिस अधिकारी, तीन कर्मचारी, होमगार्ड तसेच डॉक्टर व नर्स यांचा समावेश आहे. शनिवारी (ता. २२) दहा ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकूण ५९३ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३७ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांची तातडीने रुग्णालयात रवानगी करण्यात आली.

दरम्यान, यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पथकाचे आभारही मानतात. जेणेकरून लवकर निदान झाल्याने तातडीने उपचार घेणे शक्य झाले. तर काही जण भीतीनेच गोंधळून जात असल्याचे दिसून येते.

दूर अंतरावरूनच ठोकली धूम

नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी थांबविले असता वेगवेगळी कारणे सांगून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच नाकाबंदीवरील कोरोना तपासणीबाबत समजताच दूर अंतरावरूनच धूम ठोकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

पॉझिटिव्ह येण्याची भीती

तपासणी नको, पॉझिटिव्ह आल्यावर काय करू, भीती वाटतेय, तपासणीवेळी नाकात खूप त्रास होतो, अशी वेगवेगळी कारणे सांगून नागरिक तपासणीसाठी टाळाटाळ करतात. पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने अक्षरशः रडून गोंधळ घालतात.

पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्त संचार

या पथकाकडून अचानकपणे तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात. मात्र, त्रास जाणवत असतानाही केवळ भीतीपोटी दुर्लक्ष करून तपासणी न करता असे रुग्ण बिनधास्तपणे सर्वत्र वावरत असल्याचे नाकाबंदीवरील तपासणीतून स्पष्ट होत आहे. हे बेफिकीर रुग्ण कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT