पिंपरी-चिंचवड

'तो' उन्हात वितळतोय

मंगेश पांडे

पिंपरी : डोक्यावर तळपता सूर्य, पायाशी आग ओकणाऱ्या झळा, पिण्याचे पाणी नाही की, स्वच्छतागृहाची व्यवस्थाही नाही, कोरोनाच्या भीतीने पाँईटवर जेवायचीही धास्ती, अशाप्रकारे जीवाची लाहीलाही होत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी रणरणत्या उन्हात पोलिस अक्षरशः वितळतो आहे.

शहरातील तापमान 38 अंशावर गेल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसा, सुरक्षित रहा, असे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे अनेकजण सध्या घरी राहून कुटुंबासमवेत आनंदात वेळ घालवित आहे. मात्र, हा आनंद पोलिसाच्या नशिबी कुठून येणार. जीव धोक्‍यात घालून नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर होण्यासाठी ते घरातून बाहेर पडत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीव्हीवर कोरोनाची भयानक परिस्थिती पाहून छोटसं बाळ देखील पोलिस पप्पाला घराबाहेर जाऊ नका, असे सांगत असताना चिमुकल्याची समजूत काढून तो जड पावलांनी घरातून निघत आहे. ड्युटीवरून घरी परतताना कुटुंबीयांच्या आरोग्याच्या काळजीपोटी घरी जाऊ का नको, याबाबतचे वादळ त्याच्या मनात दिवसभर घोंघावत असते. अशी परिस्थिती सध्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याची व कुटुंबियांची आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या तीस लाख लोकसंख्येमागे केवळ तीन हजार पोलिस असून साधारण एक हजार नागरिकांमागे एक पोलिस आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी सध्याच्या कडाक्‍याच्या उन्हात तो अक्षरश: वितळत आहे. सकाळी आठ वाजता डयुटीवर उभा राहिलेला कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत पॉईंटवर हजर असतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शेकडो लोकांचे ऐकून घेत त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. अशावेळी कोणता व्यक्ती कसा येईल, याचीही खात्री नाही. यादरम्यान, एखाद्या व्यक्तीकडून दुर्देवाने कोरोनाचा संसर्ग झाल्यास जिवाची भीती आहेच. कोरोनाची लागण झाल्याने पिंपरी-चिंचवडसह पुणे, मुंबई, मालेगाव, औरंगाबाद येथील ठाण्यांत असंख्य पोलिस क्वारंटाईन झाले आहेत. तर अनेक पोलिस उपचार घेत आहेत. 

लॉकडाउनमधील बंदोबस्तापासून क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना जेवण पुरविण्यासह परप्रांतिय कामगारांच्या याद्या तयार करणे आणि आता दारूच्या दुकानांसमोरील रांगांवर नियंत्रण ठेवण्याचा भारदेखील पोलिसांवरच टाकण्यात आला आहे.

परप्रांतीयांच्या नोंदणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान एक अधिकारी चार कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून अर्ज घेण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यासमोर लांबलचक रांगा लागलेल्या असतात. पोलिस कर्मचारी शेकडो नागरिकांच्या संपर्कात येत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना पुरेशी साधनेही पुरविली नसल्याचे दिसून येते. अशा कठीण परिस्थितीत हे पोलिस जीव धोक्‍यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. 

पोलिसांनी पोटतिडकीने सांगूनही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतच आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कष्टाचे, त्यागाचे मोल या नागरिकांना कधी समजणार, त्यांची कणव तरी कधी कळणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन न करता नागरिकांनी घरातच बसल्यास त्यांनाही उसंत मिळण्यास मदत होईल. सीमेवरील सैनिकांप्रमाणे अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांची कणव नागरिकांना कधी कळणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे. 

निवडणुका, आयोध्या निकाल, सीएए, एनआरसीविरोधातील आंदोलन या बंदोबस्तात अनेक महिने पोलिस अडकले होते. यातून काहीशी उसंत मिळते ना मिळते तोच कोरोनाने डोके वर काढले. यामुळे लॉकडाउन झाल्याने पोलिस चोवीस तास रस्त्यावर आहेत.

डॉक्टरच्या भूमिकेत पोलिस

कोरोनाच्या संसर्गाची भीती असतानाही नाकाबंदीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना सामोरा जातो, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, असे आवाहन करीत रस्त्यावर चोवीस तास उभ्या असणाऱ्या डॉक्‍टरांच्या भूमिकेतील पोलिसाचा कोण विचार करणार, असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे. 

24 तास खडा पहारा

लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पिंपरी- चिंचवड शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील सिमारेषेवर 13 ठिकाणी तपासणी नाके तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी चार असे एकूण 63 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. येथे चोवीस तास तपासणी केली जात आहे. यासह कोरोनाच्या विविध पथकांमध्येही पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

सध्या पोलिस आयुक्तालयात सुमारे तीन हजार कर्मचारी आहेत. बहुतेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब येथे नसून हे कर्मचारी हॉटेल अथवा खाणावळीत जेवायचे. मात्र, सध्या काही खाणावळी बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होतात. 

येथे जेवण करणे ठरते जोखमीचे

नाकाबंदीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीही कल्पना नसते. अशा व्यक्तींची तपासणी करतानाही पोलिसांसाठी जोखमीचे ठरते. अशातच संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवायला सांगितले जाते. मात्र, त्यासाठी पाण्याचीही उपलब्धता हवी. नाकाबंदीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जेवण करायचे असल्यास सॅनिटायझर व पाणी उपलब्ध नसल्याने अनेकजण त्याठिकाणी जेवण्याचे टाळतात. 

वरिष्ठांची अचानक 'व्हिझिट' 

नाकाबंदीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी अचानक "व्हिझिट' देतात. यामुळे कर्मचाऱ्यांना कुठेही जाता येत नाही. स्वच्छतागृहासारखी सुविधा जवळपास उपलब्ध नसल्यास थोडे दूर अंतरावर जावे लागते. मात्र, त्याचवेळी वरिष्ठांनी भेट दिल्यास अडचणीचे ठरते. 

भावनिक साद 

नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, यासाठी दंडाचा वापर करणारे पोलिस आता भावनिक साद घालत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT