Police have arrested a woman who left her baby in a rickshaw 
पिंपरी-चिंचवड

अर्भकाला रिक्षात सोडून पसार झालेली जन्मदाती पोलिसांच्या ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिला. त्यानंतर या अर्भकाला एका रिक्षात सोडून जन्मदाती पसार झाली.  या महिलेला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मोरवाडी येथे घडला.

पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपी नगर येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक असल्याचा प्रकार शनिवारी (ता. २७) सकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अर्भकाला ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. मोरवाडी परिसरात पोलिसांनी तपास केला. एक महिला गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत संबंधित महिलेकडे कसून चाैकशी केली असता बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात ठेवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. 

दरम्यान, पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महिलेने हे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT