Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

पोलिस कर्मचारी महिलेला शिविगाळ करून मारहाण

विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रिक्षाचालकावर कारवाई करीत असताना वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन एकाने गोंधळ घातला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रिक्षाचालकावर कारवाई करीत असताना वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन एकाने गोंधळ घातला. पोलिस कर्मचारी महिलेला शिवीगाळ करीत गचांडी पकडून त्यांना मारहाण देखील केली. हा प्रकार पिंपरी वाहतूक विभाग कार्यालय येथे घडला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय ५१, रा. कामगार भवन समोर, पिंपरी), रिक्षाचालक अहनद मौल शेख (वय ३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संबंधित पोलिस कर्मचारी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोलिस महिला सोमवारी (ता. २६) सकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होत्या. त्यावेळी आरोपी अहनद शेख नेहरूनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे रिक्षा घेऊन विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली.

मात्र, रिक्षाचालकाने कागदपत्रे सादर न केल्याने पिंपरी वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे त्याच्यावर खटला दाखल करण्याचे कायदेशीर काम सुरू असताना आरोपी प्रल्हाद कांबळे तिथे आला. ‘आत्तापर्यंत तुम्ही किती वाहनांवर कारवाई केली याची माहिती मला तत्काळ द्या. तुम्ही हे कशासाठी करता मला चांगले माहिती आहे. पोलिस लाचार आहेत. आम्हाला इथे कशासाठी आणले ते मला माहिती आहे.’ असे म्हणत प्रल्हाद याने आरोपी रिक्षाचालकाला ‘तू जा रे इथून ही काय करते मी पाहतो.’ असे म्हणून पळवून लावले. दरम्यान, फिर्यादी या आरोपी रिक्षाचालकाला पकडण्यासाठी धावले असता प्रल्हादने फिर्यादीची गचांडी पकडून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी थांबून प्रल्‍हादने पोलिस महिलेला शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT