Eknath Khadse
Eknath Khadse sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत माझ्यामुळेच सत्ता आली होती - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेटी देत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.यात पिंपळे सौदागर,पिंपळे गुरव,जुनी सांगवी,नवी सांगवी या भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.नवी सांगवी येथील एका जनसंपर्क कार्यालयाचे त्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Eknath Khadase meets NCP leaders in Pune)

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत माझ्यामुळे सत्ता आली होती.ती आता बदलायची आहे. मी पुन्हा पुन्हा येणार म्हणणारे आज कुठे आहेत. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने या भेटींना महत्व प्राप्त झाले आहे.येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरांतील विविध भागात त्यांचे स्वागत कमानी उभारत, फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले.पिंपरी चिंचवड शहर व नवी सांगवी पिंपळे गुरव जुनी सांगवी परिसरात खान्देशी मंडळी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.पुढे बोलताना खडसे म्हणाले, भाजपा कडून ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जातो ते मला मान्य नव्हते. मी सायकल वरून प्रचार केलेल्या पक्षाने मला डावलले ही अनपेक्षित बाब होती.तसेच खानदेशचा मुख्यमंत्री झाला नसल्याची खंतही व्यक्त केली.

पुन्हा येणार म्हणणारे आज कुठेयत असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त काढतात. पण तो मुहूर्त निघूच शकत नाही.पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तास पाणी पुरवण्याची घोषणा खोटी ठरली असून पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेल मध्ये पाठवणार. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे,माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,रविकांत वरपे,प्रशांत सपकाळ,शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे,शिरिष साठे,शाम जगताप, शिवाजी पाडुळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो ओळ-नवी सांगवी येथे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विठ्ठल मुर्ती,शाल पगडी देवून स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT