private hospital sakal media
पिंपरी-चिंचवड

Private Hospital : खासगी रुग्णालये रडारवर! अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अत्यावश्यक

गेल्या सहा महिन्यांत पुण्यातील ससूनसह राज्यातील नांदेड, विरार (मुंबई) आणि देशातील दिल्ली, बंगळूर (कर्नाटक), बागपत (उत्तर प्रदेश) आदी रुग्णालयांत आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

पीतांबर लोहार

पिंपरी - गेल्या सहा महिन्यांत पुण्यातील ससूनसह राज्यातील नांदेड, विरार (मुंबई) आणि देशातील दिल्ली, बंगळूर (कर्नाटक), बागपत (उत्तर प्रदेश) आदी रुग्णालयांत आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन दक्ष झाले असून, स्वतःच्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करून सुरक्षाविषयक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. शहरातील खासगी रुग्णालयांना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अत्यावश्यक केले आहे.

महापालिकेचे शहरात आठ रुग्णालये आहेत. त्यात पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) मल्टिस्पेशालिटी असून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवला जात असल्याने रुग्‍णालयाचे महत्त्व वाढले आहे. त्याशिवाय, पिंपरीतील जिजामाता व चिंचवडमधील तालेरा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले आहे.

त्यामुळे नवीन जिजामाता आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयांसह नवीन थेरगाव, कुटे रुग्णालय आकुर्डी, नवीन भोसरी रुग्णालयांतही चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासह यमुनानगर, सांगवी रुग्णालयातही रुग्णांची नेहमी गर्दी असते.

त्यांत आगीसारखी घटना घडू नये, यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट केले आहे. त्यात स्थापत्यासह आढळलेल्या विविध त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रुग्णालयांच्या जुन्या इमारतीत स्थापत्यविषयक दुरुस्तीची कामेही सुचविण्यात आल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी नूतनीकरण आवश्‍यक

हरात सहाशेपेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. त्यांची नोंदणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे केली जाते. आता अग्निशमन विभागाकडेही त्यांची नोंदणी होत आहे. कारण, खासगी रुग्णालयांना परवानगी देताना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी अग्निशमन दलाकडून खासगी रुग्णालयांची पाहणी करून, ना-हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. शिवाय, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणेही आवश्यक आहे.

डॉक्टर म्हणतात - ऑडिट आवश्यक

सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात, ऑक्सिजन सिलिंडर असतात, औषधे असतात. फर्निचरसह इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही असतात. त्यामुळे फायर ऑडिट गरजेचे आहे. त्याबाबत काळजी न घेतल्यास दुर्घटना होऊ शकते. फायर संदर्भातील सूचनांचे पालन करणेही आवश्यक असल्याचे निगडी व चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले.

फायर ऑडिटसंदर्भात सर्व रुग्णालयांना सूचना केलेल्या आहेत. अंतिम परवानगीसाठी अर्ज केले आहेत. फायर ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात स्थापत्य, विद्युतसह संबंधित विभागांना कळवले आहे. खासगी रुग्णालयांचे ऑडिट शासकीय एजन्सीद्वारे केले जाते.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

महापालिका रुग्णालयांचे फायर ऑडिट केले आहे. त्यात आढळलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित विभागांना कळविले आहे. काहींचे पूर्ततेचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयांना अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर दहा दिवसांत त्यांनी त्रुटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

- मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT