Student Return Sakal
पिंपरी-चिंचवड

खासगी होस्टेल रिकामे; पेइंग गेस्ट आणि विद्यार्थी परतले गावाकडे

कोरोनामुळे गेले १० महिने रिकामे राहिलेल्या होस्टेलमध्ये जानेवारीपासून विद्यार्थी परतण्यास सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) गेले १० महिने रिकामे (Empty) राहिलेल्या होस्टेलमध्ये (Hostel) जानेवारीपासून विद्यार्थी (Student) परतण्यास सुरुवात झाली. मात्र, मार्चमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागू केल्यामुळे वसतिगृहांतून विद्यार्थी गावी (Vilage) परतले आहेत. परिणामी सध्या विद्यार्थ्यांअभावी होस्टेल रिकामे पडले आहेत. पेइंग गेस्टही (Paying Guest) सोडून गेल्याने मोठा आर्थिक फटका घरमालकांना बसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. (Private Hostel Empty by Paying Guest and Student Return to Hometown)

परराज्य आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी शहरात येतात. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. शहरातील रावेत, आकुर्डी, संत तुकारामनगर या परिसरातील खासगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत होस्टेल आहेत. यातून प्रत्येकी एका होस्टेलमध्ये सरासरी ५०० ते ७०० विद्यार्थी राहतात. गेल्यावर्षी लॉकडाउनचे स्वरूप माहिती नसल्याने विद्यार्थी निश्‍चित होते. होस्टेलमध्ये मेसची सोय असल्याने जेवणाची आबाळ टळली. मात्र, गावी परतण्यासाठी अनलॉकची वाट बघावी लागली. आता वर्षभरापासून होस्टेल रिकामेच असल्याची माहिती होस्टेल व्यवस्थापकांनी दिली.

अनलॉकनंतर परतलेल्या ६५ पैकी फक्त सहा विद्यार्थिनीच उरल्याची माहिती चिंचवडमधील वूमेन होस्टेलच्या सपना कंद्री यांनी दिली. लॉकडाउनआधी पेइंग गेस्ट म्हणून १५ विद्यार्थी होते, सध्या पाच विद्यार्थी असल्याचे संजय पारेख म्हणाले. एका घरात १० मुली पेइंग गेस्ट म्हणून राहतात. पण, अनलॉकनंतर केवळ दोन मुली आल्या होत्या. त्या सर्वच आता गावी परतल्याने घरमालकांचे उत्पन्न बुडाल्याचे भिलारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर अवलंबून असणाऱ्या खानावळ, स्टेशनरी सारख्या व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसल्याचे चौधरी यांनी सांगितले.

आमच्या होस्टेलमध्ये खेळाचे मैदान, मेस आणि लायब्ररीची सोय आहे. लॉकडाउन लागला तरी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. मात्र, पालकांना मागील वर्षीचे अनुभव असल्याने ते मुलांना ठेवण्यास तयार नाहीत. वर्षभरापासून होस्टेल रिकामे आहे.

- शीतलकुमार रवंदळे, अधिष्ठाता, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट होस्टेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६

New Marathi Book Releases 2025 : साहित्याची नवी मेजवानी; कुस्तीच्या लाल मातीपासून ते करिअरच्या यशोगाथेपर्यंत, वाचा ५ खास पुस्तके!

Marathi Literature Fiction : "निसर्ग काही भव्य रचण्यात वा मोडण्यात मग्न आहे..." मानवी अस्तित्वाचा वेध घेणारा एक अस्वस्थ संवाद

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

SCROLL FOR NEXT